मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Schedule 2024 : नवीन वर्षात रोहितसेना या संघांना भिडणार, असं आहे टीम इंडियाचं वेळापत्रक

Team India Schedule 2024 : नवीन वर्षात रोहितसेना या संघांना भिडणार, असं आहे टीम इंडियाचं वेळापत्रक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 30, 2023 04:40 PM IST

team india cricket schedule 2024 : केपटाउन कसोटी सामन्याद्वारे टीम इंडिया नवीन वर्षाची सुरुवात करेल. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

Team India Schedule 2024
Team India Schedule 2024 (PTI)

indian cricket team 2024 schedule : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. केपटाऊनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

विशेष म्हणजे, या केपटाउन कसोटी सामन्याद्वारे टीम इंडिया नवीन वर्षाची सुरुवात करेल. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 (ind vs afg t20 series) मालिका खेळणार आहे. 

नवीन वर्षातील टीम इंडियाचं वेळापत्रक काय?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. उभय संघांमधला पहिला टी-२० सामना ११ जानेवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता मोहाली येथे खेळवला जाईल.

यानंतर दुसरा टी-२० सामना १४ जानेवारीला ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाईल. त्याचवेळी, या मालिकेतील तिसरा टी-20 सामना १७ जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी- २५ जानेवारीपासून (हैदराबाद)

दुसरी कसोटी-२ फेब्रुवारीपासून (विशाखापट्टणम)

तिसरी कसोटी- १५ फेब्रुवारीपासून (राजकोट)

चौथी कसोटी- २३ फेब्रुवारीपासून (रांची)

पाचवी कसोटी- ७ मार्चपासून (धरमशाला)

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर IPL 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आयपीएल २०२४ चा थरार रंगणार आहे. आयपीएल कधी होणार याची अधिकृत तारीख समोर आली नाही. पण २२ मार्चपासून आयपीएल २०२४ सुरू होऊ शकते, अशी चर्चा आहे. 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi