मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  वानखेडेवर टीम इंडियाचा सन्मान, खेळाडूंनी धरला ठेका, विराट-रोहितसह द्रविडची रडवणारी भाषणं

वानखेडेवर टीम इंडियाचा सन्मान, खेळाडूंनी धरला ठेका, विराट-रोहितसह द्रविडची रडवणारी भाषणं

Jul 04, 2024 10:03 PM IST

५ दिवसांनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आज (४ जुलै) बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचली.

वानखेडेवर टीम इंडियाचा सन्मान, खेळाडूंनी धरला ठेका, विराट-रोहितसह द्रविडची रडवणारी भाषणं
वानखेडेवर टीम इंडियाचा सन्मान, खेळाडूंनी धरला ठेका, विराट-रोहितसह द्रविडची रडवणारी भाषणं (ANI)

टी-20 विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच मायेदशी परतू शकली नाही.

५ दिवसांनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आज (४ जुलै) बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचली.

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा विजेता टीम इंडियाची आज (४ जुलै) मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. मुंबईतील नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत झालेल्या या मिरवणुकीत लाखो चाहत्यांचा जनसागर सहभागी झाला होता. ओपन बसधील आपल्या आवडत्या खेळाडूची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.

ट्रेंडिंग न्यूज

टीम इंडियाचा गौरव करण्यात आला

विजयी मिरवणूकीनंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. या ठिकाणी भारतीय संघातील खेळाडूंचा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौरव केला. जय शहा यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना १२५ कोटींचा धनादेश दिला. यादरम्यान संपूर्ण टीम इंडियाला मंचावर बोलावण्यात आले.

विराट कोहली काय म्हणाला?

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली म्हणाला की, हा क्षण तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. याशिवाय भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे त्याने सांगितले. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या 5 षटकांमधील त्याने दोन षटके टाकली.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला की ही ट्रॉफी संपूर्ण देशासाठी आहे आणि प्रत्येक विश्वचषक ट्रॉफी भारतासाठी खास आहे. रोहित शर्माने हार्दिक पांड्याबद्दल सांगितले की, ही ट्रॉफी जिंकण्यात त्याची भूमिका सर्वात महत्त्वाची होती.

 

विजयी परेड दीड तास उशिरा सुरू झाली

दरम्यान, टीम इंडियाची विजयी परेड उशीराने सुरू झाली.े पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नरीमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथून सायंकाळी ५ वाजता विजयी मिरवणूक निघणार होती आणि सायंकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर संपणार होती, मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ उशिराने येथे पोहोचला. ही विजयी मिरवणूक पाहण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमी मरीन ड्राइव्हवर पोहोचले होते.

टीम इंडियाच्या फ्लाइटला वॉटर सॅल्युट

भारतीय संघ बार्बाडोसहून सकाळी ६ वाजता नवी दिल्लीला पोहोचला आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी ३.४२ वाजताच संघ मुंबईला रवाना होऊ शकला. वानखेडे स्टेडियम चाहत्यांसाठी खुले करण्यात आले आणि काही मिनिटांतच स्टेडियम खचाखच भरले. सायंकाळी पाचच्या सुमारास स्टेडियमचे दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे बरेच चाहते बाहेर थांबले होते.

भारतीय संघ विस्तारा विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर पोहोचला. या ठिकाणी विमानाला 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आला.

वानखेडे स्टेडियम खचाखच भरलेले

अधूनमधून पडणारा पाऊस, कमालीची आर्द्रता आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोकांचे आगमन यामुळे वानखेडे स्टेडियमचे दरवाजे बंद करण्यात आले. जे वानखेडेच्या आत पोहोचण्यात यशस्वी झाले ते अन्न आणि पाणी नसतानाही आपल्या जागेवर बसून राहिले. पाऊस असूनही एकाही चाहत्याने आपली जागा सोडली नाही. दरम्यान, डीजेने सर्व प्रकारच्या गाण्यांनी मनोरंजन केले आणि एका क्षणी वानखेडेमध्ये रेन-डान्स पार्टी सुरू असल्याचा भास झाला.

WhatsApp channel