Virat Kohli News : भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धचा पहिला वनडे खेळू शकला नाही. सामन्याच्या एक दिवस आधी त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला. पण आता उभय संघांमधील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी (९ फेब्रुवारी) होणार आहे.
हा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी विराट कोहलीच्या फिटनेसबाबत माहिती दिली आहे.
वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक पत्रकार परिषदेत आले होते. येथे त्यांना विराट कोहलीच्या फिटनेसबाबत प्रश्न विचारण्यात आले. कोटक यांच्या मते विराट तंदुरुस्त असून दुसऱ्या वनडेत निवडीसाठी उपलब्ध असेल. कोटक म्हणाले, विराट कोहली फिट आहे आणि निवडीसाठी उपलब्ध आहे.
विराट कोहली कोणाच्या जागी खेळणार? हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. संघ व्यवस्थापन पहिल्या वनडेत श्रेयस अय्यरला वगळणार होते. विराट खेळत नसल्याने त्याला संधी मिळाली आणि त्याने ५९ धावांची शानदार खेळी खेळली.
यानंतर अय्यर आणि यशस्वी यांच्यात कोण बाहेर होणार? याबाबतही सितांशु कोटक यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना कोटक म्हणाले, हा कर्णधार आणि प्रशिक्षकाचा कॉल असेल, मी त्याला उत्तर देऊ शकत नाही.
संबंधित बातम्या