मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : टीम इंडिया २५५ धावांवर सर्वबाद, इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य

IND vs ENG : टीम इंडिया २५५ धावांवर सर्वबाद, इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 04, 2024 03:49 PM IST

India vs England 2nd Test : दुसऱ्या डावात भारतीय संघ २५५ धावांत गारद झाला. रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव संपवला. आता इंग्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३९९ धावांचे लक्ष्य आहे.

India vs England 2nd Test
India vs England 2nd Test (REUTERS)

India vs England 2nd Test Day 3, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (४ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. 

अशाप्रकारे भारताने पहिल्या डावाचे आधारे इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले आहे. रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव संपवला.  दुसऱ्या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक १०४ धावा केल्या. अक्षर पटेलने ४५ आणि रविचंद्रन अश्विनने २९  धावांचे योगदान दिले

 इंग्लंडकडून टॉम हार्टलेने ४ विकेट घेतल्या. रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली.

कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाला फारशी चांगली सुरुवात करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या धावसंख्येमध्ये एकही धाव जोडता आली नाही. तो १४ धावा करून बाद झाला.

त्यानंतर पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा यशस्वी जैस्वालही १७ धावा करून बाद झाला. रोहित आणि यशस्वी यांना अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने बाद केले. ३० धावांत २ विकेट पडल्यानंतर गिल आणि श्रेयस अय्यर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली. दोन्ही खेळाडूंनी मिळून ८१ धावांची भागीदारी केली.

मात्र, श्रेयसला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर आपला डाव वाढवता आला नाही आणि त्याला रेहान अहमदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस बाद झाला, पण गिलने शानदार शतक झळकावून भारताची स्थिती मजबूत केली. गिलने १४७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि २ षटकारांसह १०४ धावा केल्या. गिलला अक्षर पटेलने (४५ धावा)ही पूर्ण साथ दिली. अक्षर-गिल जोडीने पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली.

यानंतर गिलला शोएब बशीरने बाद केले. गिल बाद झाल्यानंतर बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. भारताने शेवटच्या पाच विकेट ४५ धावांत गमावल्या. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. 

इंग्लंडकडून टॉम हार्टलीने सर्वाधिक ४ र आणि रेहान अहमदने ३ विकेट घेतल्या. याशिवाय जेम्स अँडरसनला दोन, तर शोएब बशीरला एक विकेट मिळाली.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi