टी-20 विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीसाठी सर्व संघ निश्चित झाले आहेत. बांगलादेशने नेपाळचा २१ धावांनी पराभव करून T20 विश्वचषकाच्या सुपर-८ मध्ये एन्ट्री केली. बांगलादेशच्या तनझिम हसन शाकिबने नेपाळविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. पण या सामन्यात त्याने एक मोठा विक्रम केला आहे.
नेपाळविरुद्धच्या सामन्यात तनझिम हसन शाकिबने ४ षटकांत केवळ ७ धावा देत ४ महत्त्वाचे बळी घेतले. त्याने २ षटके मेडन्स आणि २१ डॉट बॉल टाकले. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, एक गोलंदाज २४ चेंडू टाकू शकतो, त्यापैकी तंजीमने २१ डॉट बॉल टाकले.
टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा तो गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी, कोणत्याही गोलंदाजाने टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात २० पेक्षा जास्त डॉट बॉल टाकले नव्हते. तंझीमच्या खळबळजनक स्पेलमुळेच बांगलादेशचा संघ सामना जिंकला.
तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना एकूण १०६ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेपाळ संघाने अतिशय वाईट फलंदाजी केली. कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंग ऐरी यांनी संघासाठी चांगली सुरुवात केली, पण त्यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. कुशलने २७ आणि दीपेंद्रने २५ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून तनझिमने ४ विकेट घेतल्या. मुस्तफिजुर रहमाननेही ४ षटकांत ७ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय एक विकेट तस्किन अहमदच्या खात्यात गेली. शाकिब अल हसनने शेवटच्या षटकात २ बळी घेतले.
बांगलादेश या संघांविरुद्ध खेळणार
सुपर-८ मध्ये बांगलादेश भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. बांगलादेश संघाचा पहिला सामना २० जून रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी ३ पैकी २ सामने जिंकणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या