T20 World Cup India Squad : टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील भारतीय संघ. HT Marathi वर पाहा सर्व खेळाडूंची यादी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टी-२० वर्ल्डकप २०२४  /  विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

टी-२० वर्ल्डकप २०२४ भारतीय चमू


२०२४ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत २० संघ सहभागी होत आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं संघ सहभागी होत आहेत. त्यापैकी गतविजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, यूएसए, कॅनडा, स्कॉटलंड, आयर्लंड, नामिबिया, युगांडा, पापुआ, नेपाळ, ओमान आणि नेदरलँड सहभागी होत आहेत.

या मेगा टूर्नामेंटसाठी सर्व संघांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. न्यूझीलंडने टी-20 विश्वचषकासाठी सर्वांपूर्वी आपला संघ जाहीर केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत... प्रत्येक संघ एकापाठोपाठ एक जाहीर झाला.

३० एप्रिल रोजी टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठी आपला संघही जाहीर केला. रोहित शर्मा १५ सदस्यीय संघाचा कर्णधार आहे, तर हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आणखी एक अनुभवी फलंदाज विराट कोहलीही संघात आहे. केएल राहुल आणि रिंकू सिंगसारख्या लोकांना संघात स्थान मिळाले नाही. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यष्टिरक्षक आहेत.

जडेजा, चहल, कुलदीप आणि अक्षर पटेल या चार फिरकीपटूंची निवड करण्यात आली. बुमराह, सिराज, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. रोहित, विराट, यशस्वी, सूर्यकुमार आणि शिवम दुबे हे फलंदाज असतील.

T20 वर्ल्डसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

ऑस्ट्रेलिया T20 विश्वचषक संघ

मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टिमा डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा

USA T20 विश्वचषक संघ - मोनिक पटेल (कर्णधार, यष्टिरक्षक), आरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिस गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशुतोष केंजिगी, सौरभ नेत्रावलकर, शेडली वॉन, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.

दक्षिण आफ्रिकेचा संघ - एडन मार्कराम, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोटझिया, डी कॉक, बॉर्न फॉर्च्यून, रेझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एनरिच नोकिया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, शम्सी, ट्रिस्टन स्टब्स

इंग्लंड संघ - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वुड

न्यूझीलंड संघ केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी


  • Australia
  • David Warner
    David WarnerBatsman
  • Tim David
    Tim DavidBatsman
  • Travis Head
    Travis HeadBatsman
  • Cameron Green
    Cameron GreenAll-Rounder
  • Glenn Maxwell
    Glenn MaxwellAll-Rounder
  • Marcus Stoinis
    Marcus StoinisAll-Rounder
  • Mitchell Marsh
    Mitchell MarshAll-Rounder
  • Josh Inglis
    Josh InglisWicket Keeper
  • Matthew Wade
    Matthew WadeWicket Keeper
  • Adam Zampa
    Adam ZampaBowler
  • Ashton Agar
    Ashton AgarBowler
  • Josh Hazlewood
    Josh HazlewoodBowler
  • Mitchell Starc
    Mitchell StarcBowler
  • Nathan Ellis
    Nathan EllisBowler
  • Pat Cummins
    Pat CumminsBowler

T20 वर्ल्ड कप FAQs

Q: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण किती संघ सहभागी होत आहेत?

A: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २० संघ सहभागी होत आहेत.

Q: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये कोणते संघ सहभागी होत आहेत?

A: गतविजेत्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, यूएसए, कॅनडा, स्कॉटलंड, आयर्लंड, नामिबिया, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, ओमान, नेदरलँडसह टीम इंडिया T20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होत आहेत.

Q: टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४ साठी संघ जाहीर केला आहे का?

A: टीम इंडियाने ३० एप्रिल रोजी टी-२० विश्वचषक २०२४ साठी संघाची घोषणा केली. १५ सदस्यांचा संघ खेळत आहे.

Q: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाचा कर्णधार आणि उपकर्णधार कोण असेल?

A: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित वर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या असेल.