T20 WC Super 8 : जॉस बटलरचा संघ पुढच्या फेरीत दाखल, सुपर-८ चा फॉरमॅट आणि संपूर्ण वेळापत्रक, येथे पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC Super 8 : जॉस बटलरचा संघ पुढच्या फेरीत दाखल, सुपर-८ चा फॉरमॅट आणि संपूर्ण वेळापत्रक, येथे पाहा

T20 WC Super 8 : जॉस बटलरचा संघ पुढच्या फेरीत दाखल, सुपर-८ चा फॉरमॅट आणि संपूर्ण वेळापत्रक, येथे पाहा

Published Jun 16, 2024 11:16 AM IST

T20 World Cup 2024 Super 8 Schedule : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये इंग्लंड सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. आता त्यांची लढत वेस्ट इंडिज, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

T20 WC Super 8 : जॉस बटलरचा संघ पुढच्या फेरीत दाखल, सुपर-८ चा फॉरमॅट आणि संपूर्ण वेळापत्रक, येथे पाहा
T20 WC Super 8 : जॉस बटलरचा संघ पुढच्या फेरीत दाखल, सुपर-८ चा फॉरमॅट आणि संपूर्ण वेळापत्रक, येथे पाहा

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा ३५ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे इंग्लंडला फायदा झाला.

वास्तविक, इंग्लंड क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. रविवारी स्कॉटलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय संपादन केला. त्यांच्या विजयासह इंग्लंड सुपर ८ साठी पात्र ठरला. आता येथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिजशी होणार आहे. इंग्लंडचा पहिला सुपर ८ सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. हा सामना २० जून रोजी होणार आहे.

इंग्लंड टी-20 विश्वचषक २०२४ च्या ब गटात आहे. या गटातून ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरला होता. यानंतर इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात चुरस रंगली होती. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्कॉटलंडला पराभवावाचा सामना करावा लागला. त्यामुळे स्कॉटलंड आता वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.

स्कॉटलंडने या वर्ल्डकपमध्ये ४ सामने खेळले आणि २ जिंकले. त्यांचे ५ गुण होते आणि नेट रनरेट +१.२५५ होता. तर इंग्लंडने ४ सामने खेळले असून २ जिंकले आहेत. इंग्लंडचेही ५ गुण आहेत. पण त्यांचा नेट रनरेट चांगला आहे. इंग्लंडचा निव्वळ रन रेट +३.६११ आहे. यामुळे इंग्लंड सुपर ८ मध्ये पोहोचला आहे.

सुपर ८ मध्ये इंग्लंडचे वेळापत्रक

सुपर ८ मध्ये इंग्लंडचा पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. हा सामना २० जून रोजी होणार आहे. यानंतर त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २१ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार आहे. इंग्लंडचा शेवटचा सुपर ८ सामना अमेरिकेशी होईल. हा सामना २३ जून रोजी होणार आहे.

सुपर ८ साठी संघांचे दोन गट तयार

T20 विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ साठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान एकाच गटात आहेत. आता यामध्ये चौथा संघ बांगलादेश किंवा नेदरलँडला प्रवेश मिळेल. दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. सुपर ८ पूर्वी टीम इंडिया अ गटात होती. त्यांनी ४ पैकी ३ सामने जिंकले होते आणि एक रद्द झाला होता. भारताबरोबरच अमेरिकेनेही अ गटातून पात्रता मिळवली आहे.

टी-20 विश्वचषक सुपर ८ चे संपूर्ण वेळापत्रक

गट १

२० जून: अफगाणिस्तान विरुद्ध भारत, ब्रिजटाउन, बार्बाडोस

२० जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध डी २, नॉर्थ साऊंड, अँटिग्वा

२२ जून: भारत विरुद्ध डी २, नॉर्थ साऊंड, अँटिग्वा

२२ जून: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट

२४ जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया

२४ जून: अफगाणिस्तान विरुद्ध डी २, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट

गट २

१९ जून: अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साऊंड, अँटिग्वा

१९ जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया

२१ जून: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया

२१ जून: अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन, बार्बाडोस

२३ जून: अमेरिका विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, बार्बाडोस

२३ जून: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा

Whats_app_banner

संबंधित बातम्या