T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप २०२६ साठी हे १२ संघ पात्र, भारत-श्रीलंकेत रंगणार स्पर्धा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप २०२६ साठी हे १२ संघ पात्र, भारत-श्रीलंकेत रंगणार स्पर्धा

T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप २०२६ साठी हे १२ संघ पात्र, भारत-श्रीलंकेत रंगणार स्पर्धा

Jun 17, 2024 10:11 PM IST

T20 World Cup 2026 Qualified Teams : पुढच्या टी-20 वर्ल्डकपची म्हणजेच २०२६ मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, २०२६ च्या टी-20 वर्ल्डकपसाठी एकूण १२ संघ पात्र ठरले आहेत.

T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप २०२६ साठी हे १२ संघ पात्र, भारत-श्रीलंकेत रंगणार स्पर्धा
T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप २०२६ साठी हे १२ संघ पात्र, भारत-श्रीलंकेत रंगणार स्पर्धा

टी-20 विश्वचषक २०२४ चे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर ८ फेरीचे सामने १९ जूनपासून खेळवले जाणार आहेत. ८ संघ सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. 

मात्र, आता पुढच्या टी-20 वर्ल्डकपची म्हणजेच २०२६ मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, २०२६ च्या टी-20 वर्ल्डकपसाठी एकूण १२ संघ पात्र ठरले आहेत. 

टी-20 विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंकेत आयोजित केला जाणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ज्या फॉरमॅटमध्ये वर्ल्डकप खेळला जात आहे, त्याच फॉरमॅटमध्ये पुढचा वर्ल्ड कपही आयोजित केला जाईल. 

विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. या संघांचीही ४ गटात विभागणी करण्यात येणार आहे.

हे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले

२०२६ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी २० संघांपैकी १२ संघ पात्र ठरले आहेत. यजमान म्हणून भारत आणि श्रीलंका हे दोन संघ पात्र ठरले आहेत. टीम इंडिया सुपर ८ मध्ये पोहोचली असून ग्रुप स्टेजमध्येच श्रीलंका संघाचा प्रवास संपला. तसेच, सुपर ८ मध्ये समाविष्ट असलेले इतर संघ २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. 

याशिवाय, ICC T20 रँकिंगच्या आधारे सर्वोत्कृष्ट ३ संघांना २०२६ च्या विश्वचषकाची तिकिटे मिळतील.

तर उर्वरित ८ स्थानांचा निर्णय आयसीसी प्रादेशिक पात्रता फेरीतून होईल. अशा स्थितीत भारत आणि श्रीलंकेव्यतिरिक्त अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान २०२६ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.

या संघांची लॉटरी

T20 विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेल्या १२ संघांमध्ये असे ३ संघ आहेत, ज्यांना लॉटरी लागली आहे. हा संघ दुसरा कोणी नसून आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा संघ आहे. या संघांनी २०२४ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, परंतु आयसीसी क्रमवारीच्या आधारावर ते २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले.

न्यूझीलंडची ICC T20 रँकिंग ६ आहे, पाकिस्तानची ICC T20 रँकिंग ७ आहे आणि आयर्लंडची ICC T20 रँकिंग ११ आहे. अशा परिस्थितीत, या संघांना टी-20 वर्ल्डकप २०२६ चे तिकिट मिळाले.

 दुसरीकडे, अमेरिका सुपर ८ मध्ये गेल्याने त्यांचा फायदा झाला आहे. तर स्कॉटलंड संघाचे मोठे नुकसान झाले आहे. स्कॉटलंड संघ आयसीसी क्रमवारीच्या आधारे २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. पण १७ व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिका संघाने आपले स्थान निश्चित केले.

Whats_app_banner