टीम इंडियाने २०२४ चा टी-20 वर्ल्डकप जिंकला. यानंतर ५ दिवसांनी वर्ल्ड चॅम्पियन संघ भारतात परतला. बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया उशीरा मायदेशी परतली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयानंतर बीसीसीआयने संघासाठी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही बक्षीस रक्कम संपूर्ण संघाला देण्यात आली असून त्यात संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंचाही समावेश आहे.
आता टीम इंडियाला देण्यात आलेली रक्कम कशा प्रकारे वाटली जाईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच, या रकमेतील किती रक्कम कर म्हणून कापली जाईल, ते येथे जाणून घेऊया.
बीसीसीआयशिवाय आयसीसीनेही भारतीय संघाला सुमारे २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली आहे. तर प्रथम या रकमेवरील कराबद्दल जाणून घेऊया.
रिपोर्टनुसार, खेळाडूंना त्यांच्या फीसह व्यावसायिक फी म्हणून पैसे दिल्यास, त्या रकमेवर शुन्य टक्के टीडीएस कापला जाईल. कलम १९४ जेबी अंतर्गत या रकमेवर टीडीएस कापला जाईल. मग हा पैसा खेळाडूंच्या उत्पन्नात परावर्तित होईल आणि आयटीआरमध्ये आयकर निश्चित केला जाईल.
दुसरीकडे, ही रक्कम खेळाडूंना बक्षीस म्हणून दिली, तर त्यानुसार कर आकारला जाईल. बक्षिसाच्या रकमेवर ३ टक्के टीडीएस आधीच कापला जाईल. मग या परिस्थितीत, रकमेवर ३० टक्क्यांपर्यंत कर कापून उर्वरित रक्कम खेळाडूंना दिली जाईल.
१२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम संघातील १५ सदस्य, ४ राखीव खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सुमारे १५ सदस्यांमध्ये विभागली जाईल. यामध्ये संघातील प्रमुख १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय सपोर्ट स्टाफ आणि उर्वरित ४ राखीव खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाऊ शकतात.