मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Meet PM Modi : टीम इंडियानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खेळाडूंना नाश्त्यामध्ये काय मिळालं? जाणून घ्या

Team India Meet PM Modi : टीम इंडियानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खेळाडूंना नाश्त्यामध्ये काय मिळालं? जाणून घ्या

Jul 04, 2024 01:31 PM IST

Indian Team Meet PM Modi : टी-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने आज (४ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे.

Team India Meet PM Modi : टीम इंडियानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खेळाडूंना नाश्त्यामध्ये काय होतं? जाणून घ्या
Team India Meet PM Modi : टीम इंडियानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खेळाडूंना नाश्त्यामध्ये काय होतं? जाणून घ्या

Indian Team Meet PM Modi : टी-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने आज (४ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे.

भारतीय संघ पंतप्रधानांच्या ७, लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी पोहोचला होता. बार्बाडोसहून परतल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच भेट होती. ही बैठक बराच काळ चालली.

भारतीय संघ बार्बाडोसहून आज म्हणजेच गुरुवारी (४ जुलै) सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचला. दिल्लीला पोहोचल्यानंतर रोहित आणि कंपनीने आयटीसी मौर्या हॉटेल गाठले आणि तेथे काही काळ थांबून नरेंद्र मोदी यांची भेट मुंबईकडे रवाना झाली.

ट्रेंडिंग न्यूज

टीम इंडियाला नाश्त्यासाठी छोले-भटुरे

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आज सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू नवी दिल्लीतील आलिशान हॉटेल मौर्यामध्ये थांबले. याआधी टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. मात्र, हॉटेल मौर्यामध्ये भारतीय खेळाडूंसाठी खास नाश्ता तयार करण्यात आला होता.

हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी टीम इंडियाला छोले-भटूरे आणि लस्सी मिळाली. विराट कोहलीसोबतच टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना छोले भटुरे आवडतात.

हॉटेल मौर्या येथे भारतीय खेळाडूंसाठी छोले भटुरे, लस्सी आणि त्यांच्या आवडीचा नाश्ता तयार करण्यात आला होता. खरंतर विराट कोहलीला छोले-भटुरा आणि लस्सी खूप आवडतात. याशिवाय इतर खेळाडूंच्या आवडीनुसार नाश्ता तयार करण्यात आला होता.

मुंबईत विजयी मिरवणूक

दरम्यान, बार्बाडोस ते मुंबई अशा १६ तासांच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर टीम इंडिया दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळवार दाखल झाली. येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज मुंबईत संध्याकाळी ५ वाजता चॅम्पियन संघाचा खुल्या बसमधून मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रोड शो होणार आहे.

WhatsApp channel