मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणार! हा योगायोग बाकीच्या संघांची झोप उडवतोय, वाचा

T20 WC 2024 : वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणार! हा योगायोग बाकीच्या संघांची झोप उडवतोय, वाचा

Jun 18, 2024 12:43 PM IST

T20 World Cup 2024 West Indies : वेस्ट इंडिजचा संघाने २०१२ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामने जिंकले होते. त्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज चॅम्पियन बनला, जे त्यांचे पहिले T20 विश्वचषक विजेतेपद होते.

T20 WC 2024 : वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणार! हा योगायोग बाकीच्या संघांची झोप उडवतोय, वाचा
T20 WC 2024 : वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणार! हा योगायोग बाकीच्या संघांची झोप उडवतोय, वाचा (PTI)

T20 World Cup 2024 West Indies : टी-20 विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ तुफानी फॉर्मात दिसत आहे. ग्रुप स्टेजचे सलग चारही सामने जिंकून रोव्हमन पॉवेलचा संघ सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजने सलग ३ किंवा अधिक सामने जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. 

जेव्हा जेव्हा वेस्ट इंडिजने सलग तीन सामने जिंकले, तेव्हा संघ दोनदा चॅम्पियन झाला आणि एकदा उपांत्य फेरी गाठली.

ट्रेंडिंग न्यूज

आता या विश्वचषकात वेस्ट इंडिजने सलग ४ सामने जिंकले आहेत. हा योगायोग पाहता संघ चॅम्पियन होणार, असे दिसत आहे. आता आगामी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सलग ३ सामने जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज दोनदा चॅम्पियन

सर्व प्रथम, वेस्ट इंडिजचा संघाने २०१२ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामने जिंकले होते. त्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज चॅम्पियन बनला, जे त्यांचे पहिले T20 विश्वचषक विजेतेपद होते. 

यानंतर २०१४ टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने सलग ३ सामने जिंकले आणि संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यानंतर २०१६ T20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने सलग ३ विजय मिळवले आणि संघ चॅम्पियन झाला. २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने T20 विश्वचषकाचे दुसरे जेतेपद पटकावले.

ग्रुप स्टेजमध्ये वेस्ट इंडिजची धमाकेदार कामगिरी 

वेस्ट इंडिजचा संघ क गटात आहे. या गटात त्यांनी पापुआ न्यू गिनीविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळला. वेस्ट इंडिजने पापुआ न्यू गिनीविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाचा १३४ धावांनी पराभव केला. यानंतर रोवमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला.

त्यानंतर ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा १०४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानने शेवटचे तीनही सामने जिंकले होते. आता सुपर-८ मध्ये वेस्ट इंडिजची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

WhatsApp channel