टी-20 वर्ल्डकपचं सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांना? भारत-पाक सामन्याचं तिकिट सर्वात महाग, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टी-20 वर्ल्डकपचं सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांना? भारत-पाक सामन्याचं तिकिट सर्वात महाग, पाहा

टी-20 वर्ल्डकपचं सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांना? भारत-पाक सामन्याचं तिकिट सर्वात महाग, पाहा

Feb 02, 2024 03:35 PM IST

t20 world cup ticket price : T20 विश्वचषक १ ते २९ जून दरम्यान होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये फानयलसह एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत

t20 world cup ticket price
t20 world cup ticket price

T20 World Cup 2024 Tickets Price : टी-20 वर्ल्डकप २०२४ साठी तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. या तिकिटांचे बुकिंग ७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. 

आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते या वर्ल्डकप सामन्यांची तिकिटे t20worldcup.com या वेबसाइटवरून बुक करू शकतात.

टी-20 वर्ल्डकपच्या तिकिटांची किंमत किती?

आयसीसीने ग्रुप स्टेज, सुपर-८ आणि सेमीफायनलसाठी २.६० लाखांहून अधिक तिकिटे जारी केली आहेत. प्रत्येक तिकिटाची किंमत त्यांच्या श्रेणीनुसार बदलते.

T20 विश्वचषक १ ते २९ जून दरम्यान होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये फानयलसह एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने एकूण ९ शहरांमध्ये (३ अमेरिका आणि ६ वेस्ट इंडिज) होणार आहेत.

टी-20 वर्ल्डकपचे सर्वात कमी किंमतीचे तिकिट ६ डॉलरचे (५०० रुपये) तर टी-20 वर्ल्डकपचे सर्वात महागडे तिकिट २५ डॉलरचे (२०७१ रुपये) आहे. 

आयसीसीने सांगितलेल्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एका आयडीवरून एका सामन्याचे जास्तीत जास्त ६ तिकिटे बुक करू शकते. अशा प्रकारे कोणीही व्यक्ती वेगवेगळ्या सामन्यांची कितीही तिकिटे काढू शकते.

भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकिट किती रुपयांना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याची प्रीमियम श्रेणीतील तिकिटाची किंमत १७५ डॉलर (१४४५० रुपये) ठेवण्यात आली आहे. तर स्टँडर्ड प्लससाठी तुम्हाला २५००० रुपये मोजावे लागतील. भारत-पाकिस्तान सामन्याचे सर्वात महाग तिकीट (स्टँडर्ड कॅटेगरी) ३३००० रुपयांचे आहे.

भारत-पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमध्ये रंगणार

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी खेळला जाणार आहे. भारतीय संघ अ गटात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंडसोबत आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने भारत टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर ९ जून रोजी भारत-पाकिस्तान सामना रंगेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय व्होल्टेज सामना न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

Whats_app_banner