मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 Ticket Booking : टी-20 वर्ल्डकपसाठी तिकीट विक्री सुरू, या वेबसाइटवरून असं करा बुक

T20 World Cup 2024 Ticket Booking : टी-20 वर्ल्डकपसाठी तिकीट विक्री सुरू, या वेबसाइटवरून असं करा बुक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 02, 2024 10:42 AM IST

T20 World Cup Tickets Booking Starts : आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते या वर्ल्डकप सामन्यांची तिकिटे t20worldcup.com या वेबसाइटवरून बुक करू शकतात.

T20 World Cup Tickets Booking Starts
T20 World Cup Tickets Booking Starts

T20 World Cup 2024 Public Ticket Booking : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपची तिकिट बुकिंग सुरू झाली आहे. या तिकिटांचे बुकिंग ७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते या वर्ल्डकप सामन्यांची तिकिटे t20worldcup.com या वेबसाइटवरून बुक करू शकतात.

तिकिटाची किंमत किती?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) म्हणण्यानुसार, एका व्यक्तीला म्हणजेच आयडीला एका सामन्यासाठी जास्तीत जास्त ६ तिकिटे मिळू शकतात. अशा प्रकारे ते कितीही सामन्यांची तिकिटे बुक करू शकतात. तिकिटाची किंमत किमान ६ डॉलर्स (५०० रुपये) पासून सुरू होते.

२.६० लाखांहून अधिक तिकिटे जारी

आयसीसीने ग्रुप स्टेज, सुपर-८ आणि सेमीफायनलसाठी २.६० लाखांहून अधिक तिकिटे जारी केली आहेत. प्रत्येक तिकिटाची किंमत त्यांच्या श्रेणीनुसार बदलते.

T20 विश्वचषक १ ते २९ जून दरम्यान होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये फानयलस एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने एकूण ९ शहरांमध्ये (३ अमेरिका आणि ६ वेस्ट इंडिज) होणार आहेत.

टी-वर्ल्डकप २०२४ चा फॉरमॅट

टी-वर्ल्डकप २०२४ हा २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या २० संघांना प्रत्येकी ५ संघ अशाप्रकारे ४ गटात विभागण्यात आले आहे. यानंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-८ फेरीत ८ संघ प्रत्येकी ४ असे दोन गटात विभागले जातील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

भारत-पाक एकाच गटात

अ गट: भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट: न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

ड गट: दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi