T20 World Cup 2024 Super 8 Schedule : टी-20 विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ चे वेळापत्रक आता समोर आले आहे. दोन गटातील ८ संघ उपांत्य फेरीत लढतील. सुपर ८ च्या ग्रुप-१ मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ आहेत. तर ग्रुप-२ मध्ये अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
टी-20 विश्वचषक २०२४ चे सुपर-८ सामने १९ जूनपासून खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने कॅरेबियन भूमीवर खेळले जातील. बांगलादेश हा सुपर-८ मध्ये पोहोचणारा शेवटचा संघ ठरला. त्यांनी नेपाळचा २१ धावांनी पराभव करून सुपर-८ चे तिकीट मिळवले.
वास्तविक, दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. सुपर-८ मध्ये संघांना प्रत्येकी ३ सामने खेळायचे आहेत आणि उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना २ विजय आवश्यक आहेत. उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचतील. टी-20 वर्ल्डकप २०२४ चा अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोस येथे खेळला जाईल.
भारत
ऑस्ट्रेलिया
अफगाणिस्तान
बांगलादेश
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
इंग्लंड
वेस्ट इंडिज
दक्षिण आफ्रिका
१९ जून - रात्री ८: अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा
२० जून- सकाळी ६ - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंट लुसिया
रात्री ८: अफगाणिस्तान विरुद्ध भारत, बार्बाडोस
२१ जून- सकाळी ६- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा
रात्री ८ : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट लुसिया
२२ जून- सकाळी ६ - यूएसए विरुद्ध वेस्ट इंडिज, बार्बाडोस
२३ जून- सकाळी ६ - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, किंग्ज टाऊन
रात्री ८ - यूएसए विरुद्ध इंग्लंड, बार्बाडोस
२४ जून- सकाळी ६ - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा
रात्री 8 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सेंट लुसिया
२५ जून- सकाळी ६ - अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, किंग्ज टाऊन