T20 World Cup 2024 Super 8 team and schedule : टी-20 विश्वचषक २०२४ ची पहिली फेरी शेवटच्या टप्प्यात आहे. आत गट सामने संपणार असून सुपर ८ सामने सुरू होणार आहेत. टीम इंडिया सुपर ८ साठी पात्र ठरली आहे. त्यासोबतच आतापर्यंत ६ संघ सुपर ८ मध्ये पोहोचले आहेत. तर पाकिस्तानसह १० संघ बाहेर पडले आहेत. भारतासह इतर संघांचे सुपर-८ चे वेळापत्रक असेल, येथे जाणून घ्या.
टीम इंडियाला सुपर ८ मध्ये ३ सामने खेळायचे आहेत. भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना २० जून रोजी होणार आहे. यानंतर भारत आणि ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ यांच्यात सामना होईल. हा सामना २२ जून रोजी होणार आहे. टीम इंडिया २४ जूनला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा भारताचा शेवटचा सुपर ८ सामना असेल.
टी-20 विश्वचषक २०२४ च्या अ गटातून भारत आणि USA सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया ब गटातून पात्र ठरला आहे. दुसरा संघ अद्याप ठरलेला नाही. क गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत. दक्षिण आफ्रिका संघ ड गटातून सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. या गटातील दुसऱ्या संघाचा निर्णयही अद्याप झालेला नाही.
अ गटातील पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ २०२४ च्या T20 विश्वचषकातून बाहेर आहेत. ब गटातून नामिबिया आणि ओमान बाहेर पडले आहेत. ग्रुप सी बद्दल बोलायचे झाले तर पीएनजी, युगांडा आणि न्यूझीलंड बाहेर आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेला ड गटातून बाहेर पडावे लागले.
सुपर ८ चे सामने १९ जूनपासून सुरू होतील. पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आहे. सुपर ८ चा शेवटचा सामना २४ जून रोजी होणार आहे. हा सामना अफगाणिस्तान आणि डी-2 यांच्यात होणार आहे. यानंतर २६ जून रोजी पहिला उपांत्य सामना खेळवला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना २७ जून रोजी होणार आहे. २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे.
संबंधित बातम्या