मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC Super 8 : सुपर ८ मध्ये गाठण्याची चुरस वाढली, अमेरिका-स्कॉटलंड पुढच्या फेरीत जाणार? पाहा

T20 WC Super 8 : सुपर ८ मध्ये गाठण्याची चुरस वाढली, अमेरिका-स्कॉटलंड पुढच्या फेरीत जाणार? पाहा

Jun 11, 2024 04:42 PM IST

T20 World Cup 2024 Super 8 Qualification Chances : टी-20 विश्वचषकातील सुपर-८ ची शर्यत रंजक होत आहे. ३ असोसिएट देश पुढच्या फेरीत जाण्याच्या मार्गावर आहेत. तर इग्लंड आणि पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.

T20 WC Super 8 : सुपर ८ मध्ये गाठण्याची चुरस वाढली, अमेरिका-स्कॉटलंड पुढच्या फेरीत जाणार? पाहा
T20 WC Super 8 : सुपर ८ मध्ये गाठण्याची चुरस वाढली, अमेरिका-स्कॉटलंड पुढच्या फेरीत जाणार? पाहा (AFP)

T20 World Cup 2024 Super 8 Qualification Chances : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आत्तापर्यंत सर्वच संघांनी चकित केले आहे. दुबळ्या आणि अनुभव नसलेल्या संघांनी खूपच चांगली कामगिरी केली आहे, तर काही तगड्या आणि अनुभवी संघांनी निराशा केली.

ट्रेंडिंग न्यूज

या टी-20 वर्ल्डकपमध्ये कमी धावसंख्येचे सामने होत आहेत, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागत आहे, त्यामुळे उत्सुकतादेखील टिकून राहत आहे.

दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये यजमान यूएसएने सर्वाधिक प्रभावित केले असून, त्यांनी बलाढ्य पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.

अशा स्थितीत, सुपर ८ ची रंगत वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया की यूएसएसह कोणते असोसिएट देश T20 वर्ल्ड कपच्या सुपर-८ मध्ये स्थान मिळवू शकतात.

अमेरिकेला आणखी एक विजय आवश्यक- गट अ

युनायटेड स्टेट्सचा राष्ट्रीय संघ प्रथमच क्रिकेट विश्वचषकात सहभागी होत आहे. अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत करताच जगभरातील मीडियाने ही बातमी कव्हर केली. या संघाने आतापर्यंत विश्वचषकातील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत आणि अ गटात ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. अमेरिकेला अजून २ सामने खेळायचे आहेत, त्यापैकी एकही जिंकला तर सुपर-८ मध्ये पोहोचणे जवळपास निश्चित होईल.

स्कॉटलंड इतिहास रचू शकतो - गट ब

टी20 विश्वचषक २०२४ मध्ये स्कॉटलंड आणि इंग्लंडचा सामना पावसामुळे वाहून गेला. त्या सामन्यात मिळालेला १ गुण अजूनही स्कॉटलंडच्या बाजूने जात असल्याचे दिसते. इंग्लंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर स्कॉटलंडने ओमान आणि नामिबियाचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. स्कॉटलंडचे सध्या ५ गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट +२.१६४ असा तगडा आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या इंग्लंडला सुपर-८ मध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना ओमान आणि नामिबियाचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. पण जर स्कॉटलंड ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी झाला किंवा त्यांचा सामना रद्द झाला तरी स्कॉटलंड सुपर-८ मध्ये जाईल.

नेदरलँडला सुवर्ण संधी - गट ड

नेदरलँड्सकडे अनेक चांगले खेळाडू आहेत आणि जर संघ एकजुटीने कामगिरी करू शकला तर तो नक्कीच सुपर-८ मध्ये प्रवेश करेल. सध्या संघाने २ सामन्यांत १ विजय नोंदवला आहे आणि त्यांना अद्याप बांगलादेश आणि श्रीलंकेचा सामना करावा लागणार आहे. ड गटात दक्षिण आफ्रिकेने जवळपास सुपर-८ गाठले आहे, परंतु नेदरलँड्सला दुसरे स्थान मिळू शकते. यासाठी डच संघाला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील.

टी-२० वर्ल्डकप २०२४