T20 World Cup 2024 schedule : टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, न्यूयॉर्कमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान थरार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 schedule : टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, न्यूयॉर्कमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान थरार

T20 World Cup 2024 schedule : टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, न्यूयॉर्कमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान थरार

Jan 05, 2024 07:36 PM IST

t20 world cup 2024 schedule : आयसीसीने आगामी टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार आहे.

t20 world cup 2024 schedule
t20 world cup 2024 schedule

ICC T20 World Cup 2024 schedule announced : आयसीसीने आगामी टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक (T20 World Cup 2024 schedule announced) जाहीर केले आहे. हा टी-20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे.

भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारत-पाकिस्तान महामुकाबला ९ जून २०२४ रोजी खेळला जाणार आहे.

टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण ४ सामने खेळणार आहे. १ जूनपासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना १ जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.

तर टी- 20 विश्वचषकाचा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. स्पर्धेतील गट टप्प्यातील सामने १ ते १८ जून दरम्यान खेळवले जातील.

यानंतर १९ ते २४ जून दरम्यान सुपर-८ सामने होणार आहेत. त्यानंतर २६ आणि २७ जून रोजी उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील आणि शेवटी २९ जून रोजी वर्ल्डकप फायनल खेळली जाईल.

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचं वेळापत्रक

५ जून - भारत विरुद्ध आयर्लंड

९ जून - भारत विरुद्ध पाकिस्तान

१२ जून - भारत विरुद्ध अमेरिका

१५ जून- भारत विरुद्ध कॅनडा.

कोणता संघ कोणत्या गटात?

अ गट - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा फॉरमॅट

आगामी T20 विश्वचषक २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आधी २० संघांना प्रत्येकी ५ संघ अशा ४ गटात विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-८ फेरीत ८ संघ प्रत्येकी ४ असे दोन गटात विभागले जातील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या