टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी (९ जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. या विजयानंतर टीम इंडिया आता अ गटात गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान संघ चौथ्या स्थानावर आहे.
टी-20 वर्ल्ड कप २०२४ च्या ग्रुप A मधील पॉइंट टेबलमध्ये यूएसए ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर आयर्लंड आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावल्यानंतर शून्य गुणांसह तळाशी आहे.
बी गटातील गुणतालिकेत स्कॉटलंड ५ गुणांसह अव्वल, तर ओमान शून्य गुणांसह तळाशी आहे.
अफगाणिस्तान ३ गुणांसह गटात पहिल्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंड शून्य गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
ड गटातील गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका ४ गुणांसह आघाडीवर आहे तर श्रीलंका शून्य गुणांसह तळाशी आहे.
वास्तविक, टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या गुणतालिकेत प्रत्येक सामन्याच्या शेवटी, विजेत्या संघाला २ गुण मिळतात, तर पराभूत संघाला एकही गुण मिळत नाहीत. सामना कोणत्या कारणाने रद्द झाला तर दोन्ही संघाला एक-एक गुण मिळतो.
ए गटात भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड आणि युनायटेड स्टेट्स हे संघ आहेत.
बी गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान यांचा समावेश आहे.
सी गटात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांचा समावेश आहे.
डी गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या