मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC Points Table : टी-20 वर्ल्डकपच्या गुणतालिकेत भारताची घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल, इतर संघांची स्थिती काय? पाहा

T20 WC Points Table : टी-20 वर्ल्डकपच्या गुणतालिकेत भारताची घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल, इतर संघांची स्थिती काय? पाहा

Jun 21, 2024 02:02 PM IST

T20 World Cup 2024 Points Table : ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने ग्रुप-१ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

टी-20 वर्ल्डकपच्या गुणतालिकेत भारताची घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल, इतर संघांची स्थिती काय? पाहा
टी-20 वर्ल्डकपच्या गुणतालिकेत भारताची घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल, इतर संघांची स्थिती काय? पाहा (AFP)

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची विजयी मोहीम अखंडपणे सुरू आहे. साखळी सामन्यांनंतर टीम इंडियाने सुपर-८ फेरीलागही शानदार शैलीत सुरुवात केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने (२० जून) अफगाणिस्तानचा ४७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याचवेळी या गटातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने होते.

ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने ग्रुप-१ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर गुणतालिकेत किती बदल?

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान २-२ गुण असले तरी कांगारूंचा नेट रनरेट चांगला आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +२.४७१ आहे. तर भारतीय संघाचा नेट रनरेट +२.३५० आहे. त्याचबरोबर या गटात अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.

भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केला.

याशिवाय ग्रुप-२ मध्ये इंग्लंड २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे समान २-२ गुण आहेत.

आता भारतीय संघ आपला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि बांगलादेशचे संघ २२ जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया २४ जूनला आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी स्टेडियमवर भिडतील.

भारतीय संघाने साखळी फेरीत आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेला पराभूत केले होते. आता टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला. आतापर्यंत भारताने सर्व सामने जिंकले आहेत.

WhatsApp channel