
महिला टी-20 विश्वचषकात आज (१४ ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. दुबईत सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटका ६ बाद ११० धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला १११ धावा करायच्या आहेत.
पण सेमी फायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला हे लक्ष्य १०.४ षटकात गाठावे लागणार आहे. पण जर १०.४ षटकानंतर पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले तर भारतीय संघ सेमी फायनलमध्ये जाईल. कारण भारताचे नेट रनरेट चांगले आहे. तसेच, न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर ते सेमी फायनलमध्ये जातील. कारण त्यांचे ६ गुण होतील.
विशेष म्हणजे, हा सामना टीम इंडियासाठी अतिशय महत्वाचा आहे. तसेच, या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवाला, अशी प्रार्थना टीम इंडिया करत आहे. कारण न्यूझीलंड हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर भारताचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच संपेल.
तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने सर्वाधिक २८ धावा केल्या, तर ब्रूक हॅलिडेने २२ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून नशरा संधूने अप्रतिम गोलंदाजी करत चार षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतले.
चांगल्या सुरुवातीनंतर न्यूझीलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावलेल्या न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध ५८ धावांत ३ गडी गमावले. नशरा संधूने पॉवरप्ले संपल्यानंतर सलामीवीर जॉर्जिया प्लिमरला बाद करत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले.
यानंतर नशराने २९ चेंडूत २८ धावा करून बाद झालेल्या बेट्सलाही आपला बळी बनवले. ओमाइमा सोहेलने अमेलिया केरला मोठी खेळी करण्यापासून रोखले आणि फातिमा सनाला झेलबाद केले. १७ चेंडूंत ९ धावा करून अमेलिया केर बाद झाली.
केर बाद झाल्यानंतर ब्रुकने काही प्रमाणात संघावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानी गोलंदाजांनी न्यूझीलंडवर घट्ट पकड ठेवली.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन - मुनिबा अली (विकटेकीपर), सिद्दी अमीन, सदफ शम्स, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा रूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन- सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.
संबंधित बातम्या
