Most wickets in a T20 World Cup Edition for India : टी-20 विश्वचषक २०२४ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडकडून गेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा बदला घेतला. वास्तविक, भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून T20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
या सामन्यात गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यासह जसप्रीत बुमराहने विकेट घेत आरपी सिंग आणि रविचंद्रन अश्विन यांना मागे टाकले. या खास रेकॉर्डमध्ये अर्शदीप सिंग अव्वल स्थानावर आहे. हा विक्रम एका T20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
अर्शदीप सिंगने आता ICC T20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. अर्शदीप सिंगने T20 विश्वचषक २०२४ सुपर ८ सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट घेत ही कामगिरी केली. यानंतर जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरपी सिंग तिसऱ्या क्रमांकावर आणि रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे.
T20 विश्वचषक २०२४ मध्ये, अर्शदीप सिंगने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. या ७ सामन्यात त्याने ७.५० च्या इकॉनॉमीने १५ विकेट घेतल्या आहेत.
टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. या ७ सामन्यात त्याने ४.१२ च्या इकॉनॉमीसह १३ विकेट घेतल्या आहेत.
आरपी सिंगने २००७ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ७ सामने खेळले होते. या ७ सामन्यांमध्ये त्याने ६.३३ च्या इकॉनॉमीसह १२ विकेट्स घेतल्या.
रविचंद्रन अश्विनने टी-20 विश्वचषक २०१४ मध्ये ६ सामने खेळले. या ६ सामन्यांमध्ये त्याने ५.३५ च्या इकॉनॉमीसह ११ विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या