T20 WC 2024 : कर्णधार ३७ वर्षांचा, १० खेळाडूंनी तिशी ओलांडली; म्हाताऱ्या खेळाडूंसह टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार?-t20 world cup 2024 india squad have 10 players over age 30 years including rohit sharma virat kohli hardik pandya ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : कर्णधार ३७ वर्षांचा, १० खेळाडूंनी तिशी ओलांडली; म्हाताऱ्या खेळाडूंसह टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार?

T20 WC 2024 : कर्णधार ३७ वर्षांचा, १० खेळाडूंनी तिशी ओलांडली; म्हाताऱ्या खेळाडूंसह टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार?

May 30, 2024 08:38 PM IST

T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित शर्माने वयाची ३७ वर्षे ओलांडली आहेत, तर विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे पण त्यानेही वयाची ३५ वर्षे ओलांडली आहेत. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यासह संघातील १० खेळाडूंचे वय ३० किंवा त्याहून अधिक आहे.

T20 World Cup 2024 : टीम इंडिया म्हाताऱ्यांचा संघ, १० खेळाडू ३० वर्षांच्या पुढचे; वर्ल्डकप कसा जिंकणार?
T20 World Cup 2024 : टीम इंडिया म्हाताऱ्यांचा संघ, १० खेळाडू ३० वर्षांच्या पुढचे; वर्ल्डकप कसा जिंकणार? (AFP)

वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने २ जूनपासून टी-20 विश्वचषकाचा महाकुंभ सुरू होत आहे. या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत, परंतु भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे. टीम इंडियाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.

पण टीम इंडियाच्या संपूर्ण वर्ल्डकप स्क्वॉडकडे पाहिले तर संघात वृद्ध खेळाडूंची संख्या खूप जास्त आहे. विशेष म्हणजे २०२२ च्या विश्वचषकानंतर बीसीसीआय युवा खेळाडूंना टी-20 फॉरमॅटसाठी तयार करू इच्छित असल्याची बातमी समोर आली होती.

मात्र २०२४ पर्यंत भारतीय क्रिकेट मंडळाने पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. ३७ वर्षांचा रोहित शर्मा या टी-20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्याशिवाय १५ सदस्यीय संघातील १० खेळाडू ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

१० खेळाडू ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे

कर्णधार रोहित शर्माने वयाची ३७ वर्षे ओलांडली आहेत, तर विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे पण त्यानेही वयाची ३५ वर्षे ओलांडली आहेत. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यासह संघातील १० खेळाडूंचे वय ३० किंवा त्याहून अधिक आहे.

त्याच वेळी, संघातील केवळ टीम इंडियामध्ये ५ खेळाडू ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. युवा खेळाडूंच्या यादीत केवळ ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांचा समावेश होऊ शकतो. तसेच, राखीव असलेल्या चार खेळाडूंचे वय ३० पेक्षा कमी आहे.

भारत पहिला सामना कधी खेळणार?

भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताला अ गटात ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये भारत-आयर्लंड व्यतिरिक्त पाकिस्तान, कॅनडा आणि यजमान देश यूएसए यांचा समावेश आहे. ९ जून रोजी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे.

टी-20 वर्ल्डकप भारतीय संघातील खेळाडू आणि त्यांचे वय- रोहित शर्मा (३७), विराट कोहली (३५), यशस्वी जैस्वाल (२२), सूर्यकुमार यादव (३३), ऋषभ पंत (२६), संजू सॅमसन (२९), हार्दिक पंड्या (३०), शिवम दुबे (३०), रवींद्र जडेजा (३५), अक्षर पटेल (३०), कुलदीप यादव (२९), युजवेंद्र चहल (३३), अर्शदीप सिंग (२५), मोहम्मद सिराज (३०), जसप्रीत बुमराह (३०).

Whats_app_banner