मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना आयर्लंडशी, पाकिस्तानशी कधी भिडणार? जाणून घ्या

T20 WC 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना आयर्लंडशी, पाकिस्तानशी कधी भिडणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 04, 2024 12:46 PM IST

T20 World Cup 2024 Schedule : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना ५ जून रोजी खेळणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी खेळला जाणार आहे.

T20 World Cup 2024 Schedule
T20 World Cup 2024 Schedule (REUTERS)

आगामी टी-20 वर्ल्डकप जूनमध्ये खेळला जाणार आहे. म्हणजेच आता या टी-20 विश्वचषकाला काही महिनेच उरले आहेत. या स्पर्धेचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार आहे.

पण सुत्रांच्या माहितीनुसार, टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक निश्चित झाले असून भारतीय संघ ५ जूनला आपला पहिला सामना खेळणार आहे. तर टी-20 वर्ल्डकप २०२४ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी खेळला जाईल.

एका स्पोर्ट्स चॅनेलच्या दाव्यानुसार, टी-20 वर्ल्डकप ४ जूनपासून सुरू होईल. तर भारतीय संघ ५ जूनपासून आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करेल. ५ जून रोजी भारताचा सामना आयर्लंडविरुद्ध असेल. त्याचवेळी ९ जून रोजी टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचे ग्रुप स्टेजमधील ३ सामने न्यूयॉर्कमध्ये होण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचे वेळापत्रक असे असू शकते

५ जून: भारत विरुद्ध आयर्लंड (न्यूयॉर्क)

९ जून: भारत विरुद्ध पाकिस्तान (न्यूयॉर्क)

१२ जून: भारत विरुद्ध यूएसए (न्यूयॉर्क)

१५ जून: भारत विरुद्ध कॅनडा (फ्लोरिडा)

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा फॉरमॅट

आगामी T20 विश्वचषक २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आधी २० संघांना प्रत्येकी ५ संघ अशा ४ गटात विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-८ फेरीत ८ संघ प्रत्येकी ४ असे दोन गटात विभागले जातील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

या टी-20 विश्वचषकात ४५ सामने होणार असून त्यातील एक तृतीयांश सामने अमेरिकेत आणि बाकीचे कॅरेबियनमध्ये भूमिवर खेळवले जातील.

इंग्लंड चॅम्पियन

सध्या इंग्लंडचा संघ टी-२० विश्वचषक विजेता आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लिश संघाने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. याआधी २०१० साली वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्यात इंग्लंड संघाला यश आले होते.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi