T20 World Cup 2024 IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर भारताने पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. आता भारत ९ जूनला पाकिस्तानशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. पण या सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने निवृत्तीतून यू-टर्न घेत संघात आपली जागा निश्चित केली आहे. या अनुभवी गोलंदाजाने अमेरिकेविरुद्ध गोलंदाजी करताना एक विकेट घेतली होती. आता त्याने भारताविरुद्धच्या सामन्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, याआधीही आमिरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आमिर विराट कोहलीसोबत घडलेल्या एका मजेदार घटनेचा उल्लेख करताना दिसत आहे.
वास्तविक, आशिया कपसाठी भारत आणि पाकिस्तान बांगलादेशला गेले होते. तिथे इमाद वसीम विराट कोहलीची बॅट पाहताना दिसला. यानंतर मोहम्मद आमिरने विराट कोहलीकडे बॅट मागितली होती. तेव्हा विराट कोहली म्हणाला होता की, भारतात, विश्वचषक खेळायला येशील तेव्हा देईन. त्यानंतर २०१६ च्या टी-20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा विराटने आमिरला बॅट भेट दिली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक २०२४ चा महामुकाबला ९ जून म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे. T20 विश्वचषकात दोन्ही संघ आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत. T20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताला फक्त एकदाच पराभूत केले आहे, तर भारताला ६ वेळा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संबंधित बातम्या