Ind vs Ireland Pitch : भारत-आयर्लंड सामन्यात खेळपट्टी कशी असेल? सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Ireland Pitch : भारत-आयर्लंड सामन्यात खेळपट्टी कशी असेल? सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

Ind vs Ireland Pitch : भारत-आयर्लंड सामन्यात खेळपट्टी कशी असेल? सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

Published Jun 05, 2024 11:11 AM IST

Ind vs Ireland Pitch Report : भारतीय संघ टी-20 विश्वचषकातील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार आज रात्री ८ वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील.

Ind vs Ireland Pitch : भारत-आयर्लंड सामन्यात खेळपट्टी कशी असेल? सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या
Ind vs Ireland Pitch : भारत-आयर्लंड सामन्यात खेळपट्टी कशी असेल? सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

ind vs ireland pitch report t20 world cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा ८ वा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. दोघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हे एक नवीन स्टेडियम आहे, ज्यावर केवळ दोन सामने खेळले गेले आहेत. या मैदानाची खेळपट्टी आतापर्यंत समजण्यापलीकडची आहे. अशा स्थितीत भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात येथील खेळपट्टी कशी असू शकते? याचा अंदाजा आपण येथे घेणार आहोत.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे, ही अशी खेळपट्टी आहे, जी दुसऱ्या ठिकाणी बनवली गेली आणि नंतर या स्टेडियममध्ये आणून बसवली गेली आहे.

वास्तविक, येथील खेळपट्टीसाठी ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथील मातीचा वापर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर चांगली उसळी पाहायला मिळते, त्यामुळेच नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवरही बाउन्स दिसला. मात्र, ही उसळी असमान होती, ज्यामुळे फलंदाजांना खूप त्रास झाला. याशिवाय आऊटफिल्डही खूपच संथ दिसली.

या मैदानावर टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला. भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ दाखवला होता. पण यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा संघ आफ्रिकन गोलंदाजांनी १९.१ षटकात अवघ्या ७७ धावांत गारद केला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने १६.२ षटकांत विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाजासोबत फिरकीपटूंनाही मदत मिळाली.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, शिवम दुबे.

टी-20 विश्वचषकासाठी आयर्लंडचा संघ

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, रॉस अडायर, बॅरी मॅककार्थी, मार्क अडायर, जोशुआ लिटल, क्रेग यंग, ​​बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम .

Whats_app_banner

संबंधित बातम्या