T20 World Cup 2024 IND vs BAN : टी २० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीत भारताने बांगलादेशचा ५० धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर भारताने १९६/५ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून १४६ धावा केल्या. टीम इंडियाचा सध्याच्या स्पर्धेतील हा पाचवा विजय आहे. भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली आहे. बांगलादेशविरुद्ध भारताच्या शानदार विजयानंतर टीम इंडियाने जल्लोष केला. तर या विश्वचकातील बांग्लादेशचे आवाहन संपुष्टात आले आहे. सलग दोन पराभव झाल्याने बंगालदेश या स्पर्धेतून बाहेर पाडला आहे. सुपर ८ मध्ये भारताने लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवलाय. अफगाणिस्तान व बांगलादेशचा पराभव करत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता शेवटचा सामना हा सोमवारी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे.
शनिवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी २० वर्ल्ड कपचा सुपर ८ सामना चांगलाच रंगला. या सामन्यात भारतीय संघाने पाच विकेट गमवत तब्बल १९६ धावांचा डोंगर उभा केला. पण, बांगलादेशचा संघाचे ८ गाडी बाद होऊन त्यांना केवळ १४६ धावा करता आल्याने त्यांचा ५० धावांनी पराभव झाला.
अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. भारताने फलंदाजीला येत मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष ठेवले होते. मात्र पहिल्या काही ओव्हरमध्ये बांग्लादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला मोठा धक्का देत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला तंबूत परत पाठवले. रोहित शर्मा २३ तर विराट कोहलीने २८ धावा काढून बाद झाला. यानंतर रिषभ पंतने ३६, शिवम दुबेने ३४ धावा केल्या. हार्दिक पंड्याने ५० धावांची खेळी केली. तर बांगलादेशच्या गोलंदाजांना टीम इंडियाच्या 5 विकेट्स देखील घेतल्या.. या कामगिरीमुळे तो या सामन्यात तो सामना वीर ठरला.
हार्दिक पंड्याने अर्धशतकी खेळी खेळतांना ४ चौकार व ३ षटकार लगावले. पंड्याचे हे टी २० मधील हे चौथे अर्धशतक होते. बांगलादेशच्या गोलंदाजांपैकी रिशाद हुसेन व तन्झिम हसन साकिब यांनी प्रत्येकी २ विकेट्स तर शाकिब अल हसनने १ विकेट घेतली.
बांगलादेशच्या संघाची भारताने उभ्या केलेल्या धावसंख्यांचा डोंगर पार करतांना चांगलीच दमछाक झाली. कॅप्टन शांतोने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर तनजीद हसनने २९, लिटन दासने १३, रिशाद हुसेनने २४, शाकिब अल हसनने ११, महमुदुल्लाने १३ धावा केल्या. मात्र बांगलादेशच्या धावांचा हा डोंगर पार करता आला नाही. २० षटकात बांग्लादेशच्या संघाने ८ गडी गमवून १४६ धावा केल्याने त्यांचा ५० धावांनी पराभव झाला.
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी केली. सहाव्या क्रमांकावर आल्यावर त्याने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. त्याचवेळी हार्दिकने तीन षटकांच्या स्पेलमध्ये ३२ धावा देत एक विकेट घेतली. त्याने लिटन दासला (१३) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. हार्दिक हा सामनावीर ठरला.
अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत प्रथमच आपल्या सर्वोत्तम रंगात दिसला. त्याने २८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. कोहलीने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याने दोन महत्त्वाच्या भागीदारी केल्या. कोहलीने कर्णधार रोहित शर्मासोबत (२३ धावा) पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची आणि ऋषभ पंतसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. याआधी टूर्नामेंटमध्ये कोहलीने चार डावात एकूण २९ धावा केल्या होत्या.
यष्टिरक्षक ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली. वन डाउन आलेल्या पंतने २४ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि दोन षटकार आले. त्याने केवळ कोहलीसोबतच नाही तर शिवम दुबेसोबतही चांगली भागीदारी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. एकाच षटकात कोहली आणि सूर्यकुमार यादव (६) बाद झाल्याने पंतने संघाच्या धावांचा वेग वाढवला.
फिरकीपटू कुलदीप यादवने पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी केली. अफगाणिस्तानविरुद्ध दोन बळी घेणारा कुलदीप बांगलादेशच्या सामन्यात फायदेशीर ठरला आणि त्याने तीन बळी घेतले. त्याने चार षटकांत केवळ १९ धावा दिल्या. सलामीवीर तनजीद हसन (२९), तौहीद हृदयॉय (४) आणि शकीब अल हसन (११) या खेळाडूंना त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बांगलादेशचा संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. किफायतशीर गोलंदाजी करत त्याने दोन बळी घेतले. बुमराहने चार षटकात केवळ १३ धावा दिल्या. त्याने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो (४०) आणि रिशाद हुसेन (२४) यांना पायचीत केले. बुमराहने आतापर्यंत पाच सामन्यांत एकूण १० विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे अर्शदीप सिंग (१२) आहे.