england vs south africa t20 world cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये शुक्रवारी (२१ जून) दोन मोठे संघ भिडणार आहेत. रात्री ८ वाजल्यापासून इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. या स्पर्धेतील हा ४५वा सामना आणि सुपर ८ चा ५वा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
सुपर-८ मध्ये दोन्ही संघांची सुरुवात चांगली झाली असून त्यांनी प्रत्येकी पहिला सामना जिंकला आहे. आता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दुसरा सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, दोन्ही संघांना आज विजय मिळवणे, तितकासे सोपे असणार नाही. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघांनी समसमान सामने जिंकले आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लिश संघाने १० सामने जिंकले असून प्रोटीज संघाने १२ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामनाही अनिर्णित राहिला आहे.
टी-20 विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ६ सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिका संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. T20 विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत ६ वेळा आमनेसामने आले आहेत. यात इंग्लंडने केवळ २ सामने जिंकले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेने ४ सामने जिंकले आहेत.
इंग्लंड: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी.
संबंधित बातम्या