मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Adam Zampa: टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झम्पाच्या ३०० विकेट्स पूर्ण!

Adam Zampa: टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झम्पाच्या ३०० विकेट्स पूर्ण!

Jun 06, 2024 08:30 PM IST

Adam Zampa completes 300 T20 wickets: आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात झम्पाने हा टप्पा गाठला.

ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाने 300 टी-20 विकेट पूर्ण केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाने 300 टी-20 विकेट पूर्ण केल्या आहेत.

T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाने बुधवारी ३०० टी-२० बळींचा टप्पा गाठला आणि तो गाठणारा आपल्या देशाचा दुसरा गोलंदाज ठरला. आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतील ओमानविरुद्ध बार्बाडोसयेथे झालेल्या सामन्यात झम्पाने हा टप्पा गाठला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात झम्पाने चार षटकांत २४ धावांत २ बळी घेत विध्वंसक स्पेल दिला. झम्पाने २५८ टी-२० सामन्यात २२.६४ च्या सरासरीने, ७.४४ च्या इकॉनॉमी रेटने आणि १८.२० च्या स्ट्राईक रेटने ३०१ विकेट्स घेतल्या आहेत. १९/६ ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. विश्वचषकात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

अ‍ॅडम झम्पाची नव्या विक्रमाला गवसणी

टी-२० क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय आहे, ज्याने २३९ सामन्यांमध्ये २१.१५ च्या सरासरीने आणि ८.२१ च्या इकॉनॉमी रेटने ३३२ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० प्रकारात वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो, अफगाणिस्तानचा शॉर्ट फॉरमॅटचा सुपरस्टार फिरकीपटू राशिद खान आणि वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू सुनील नारायण यांचा समावेश आहे.

स्टॉयनिस- वॉर्नरची अर्धशतकी खेळी

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला ओमानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघ एका क्षणी ३ बाद ५० धावांवर होता. मात्र, मार्कस स्टॉयनिस आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. ओमानकडून मेहरान खान अव्वल गोलंदाज ठरला.

ओमानचा ३९ धावांनी पराभव

धावांचा पाठलाग करताना ओमान नियमित अंतराने विकेट गमावल्या. अयान खान आणि मेहरान यांच्यात लढत झाली असली तरी ओमानला २० षटकांत ९ बाद १२५ धावा करता आल्या आणि त्यांना ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

मार्कस स्टॉयनिसची अष्टपैलू कामगिरी

स्टॉयनिसने ही चांगली कामगिरी केली असून अ‍ॅडम झम्पा, नॅथन एलिस आणि मिचेल स्टार्क यांनीही दोन विकेट्स घेतल्या. स्टॉयनिसच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. 

टी-२० वर्ल्डकप २०२४