मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  चॅम्पियन टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, रोहित-कोहलीची पहिली झलक पाहा, विमानतळावर जल्लोषात स्वागत

चॅम्पियन टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, रोहित-कोहलीची पहिली झलक पाहा, विमानतळावर जल्लोषात स्वागत

Jul 04, 2024 08:26 AM IST

Team India Welcome : टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. चॅम्पियन संघाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी दिल्ली विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली होती.

चॅम्पियन टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, रोहित-कोहलीची पहिली झलक पाहा, विमानतळावर जल्लोषात स्वागत
चॅम्पियन टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, रोहित-कोहलीची पहिली झलक पाहा, विमानतळावर जल्लोषात स्वागत

T20 world Champion Team India Arrives Delhi : टी-20 वर्ल्डकप २०२४ जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (२९ जून) भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय चाहते चॅम्पियन टीम इंडिया ट्रॉफीसह देशात परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता आज म्हणजेच ४ जुलैला सकाळी रोहित शर्माची चॅम्पियन टीम दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली.

भारतीय संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक ट्रॉफीसह सकाळी ६:०९ वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती. चॅम्पियन संघ आणि ट्रॉफीची झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. सर्व चाहते आनंदाने भरून आले. चाहते भारत माता की जयच्या घोषणा देत होते. त्यांच्या हातात तिरंगा होता.

ट्रेंडिंग न्यूज

चॅम्पियन टीम इंडिया बेरिल वादळात अडकली होती

टी-20 विश्वचषक २०२४ संपल्यानंतर बेरील वादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथील हॉटेलमध्ये अडकली होती. त्यामुळे सर्व विमान प्रवास बंद करण्यात आला. वादळ शमल्यानंतर टीम इंडियाला विशेष विमानाने परत आणण्यात आले.

वर्ल्डकप फायनलमध्ये काय घडलं?

बार्बाडोस येथे झालेल्या टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले, पण यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या बळावर भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या.

त्याचवेळी भारताच्या १७६ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत सर्वाधिक ५२ धावा केल्या, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.

WhatsApp channel