IND vs SA Dream 11 : भारत-आफ्रिका फायनलमध्ये या खेळाडूला करा कॅप्टन, ड्रीम इलेव्हनर अशी बनवा परफेक्ट टीम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Dream 11 : भारत-आफ्रिका फायनलमध्ये या खेळाडूला करा कॅप्टन, ड्रीम इलेव्हनर अशी बनवा परफेक्ट टीम

IND vs SA Dream 11 : भारत-आफ्रिका फायनलमध्ये या खेळाडूला करा कॅप्टन, ड्रीम इलेव्हनर अशी बनवा परफेक्ट टीम

Published Jun 28, 2024 10:30 PM IST

IND vs SA Dream 11 Team Prediction: आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

 IND vs SA Dream 11 : भारत-आफ्रिका फायनलमध्ये या खेळाडूला करा कॅप्टन, ड्रीम इलेव्हनर अशी बनवा परफेक्ट टीम
IND vs SA Dream 11 : भारत-आफ्रिका फायनलमध्ये या खेळाडूला करा कॅप्टन, ड्रीम इलेव्हनर अशी बनवा परफेक्ट टीम (AP)

टी-20 विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना (२९ जून) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल.

आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

दोन्ही संघांनी स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत हा सामना खूपच रंजक असणार आहे. दरम्यान, भारत असो की दक्षिण आफ्रिका, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

IND vs SA Dream 11 Team Prediction

यष्टिरक्षक: ऋषभ पंत, क्विंटन डी कॉक (उपकर्णधार)

फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम

अष्टपैलू: अक्षर पटेल, मार्को जेन्सन, हार्दिक पांड्या

गोलंदाज: जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा/ अर्शदीप सिंग

पीच रिपोर्ट

भारत-आफ्रिका फायनल बार्बाडोस स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टीवर बॅट आणि बॉलमध्ये कडवी स्पर्धा आहे. येथे वेगवान गोलंदाजांना चांगला बाऊन्स आणि स्विंग मिळतो. मोठी खेळी खेळण्यासाठी फलंदाजांना अधिक वेळ क्रीजवर घालवावा लागतो. जसजसा खेळ पुढे जाईल तसतसे येथे फिरकीपटूंना मदत मिळू लागेल.

भारत वि. आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या