Shreyas Iyer Captain : श्रेयस अय्यर पुन्हा कर्णधार, केकेआरने सोडले, पण या संघाने दिली मोठी जबाबदारी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shreyas Iyer Captain : श्रेयस अय्यर पुन्हा कर्णधार, केकेआरने सोडले, पण या संघाने दिली मोठी जबाबदारी

Shreyas Iyer Captain : श्रेयस अय्यर पुन्हा कर्णधार, केकेआरने सोडले, पण या संघाने दिली मोठी जबाबदारी

Nov 17, 2024 10:15 PM IST

Syed Mushtaq Ali Trophy 2024 Mumbai Squad : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये मुंबईचा पहिला सामना गोव्याशी होणार आहे.

Shreyas Iyer Captain : श्रेयस अय्यर पुन्हा कर्णधार, केकेआरने  सोडले, पण या संघाने दिली मोठी जबाबदारी
Shreyas Iyer Captain : श्रेयस अय्यर पुन्हा कर्णधार, केकेआरने सोडले, पण या संघाने दिली मोठी जबाबदारी

श्रेयस अय्यर याला आयपीएल २०२५ पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने रीली ज केले होते. श्रेयसच्या नेतृत्वात केकेआरने गेल्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. पण तरीही अय्यर याला केकेआरने संघासोबत ठेवले नाही. 

पण आता अय्यरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईने त्याला कर्णधार बनवले आहे. अय्यर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये खेळणार आहे.

अय्यरचा आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. जरी तो सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. पण अय्यर देशांतर्गत सामन्यांमध्ये सतत खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यर याला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये मुंबईचा पहिला सामना गोव्याशी होणार आहे. अय्यर या स्पर्धेत खेळणार आहे. IPL २०२५ मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अय्यर याला यातून मोठी रक्कम मिळू शकते.

अजिंक्य रहाणे अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार 

रहाणे हा अनुभवी खेळाडू असून त्याने टीम इंडियासाठी तसेच देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रहाणेने कर्णधारपदही भूषवले आहे. मात्र सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तो मुंबई संघाचा भाग असेल. रहाणेसोबत पृथ्वी शॉ यालाही मुंबईच्या संघात स्थान मिळाले आहे.

श्रेयस अय्यरचा आतापर्यंतचा  क्रिकेट रेकॉर्ड 

श्रेयसने भारतासाठी १४ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ८११ धावा केल्या आहेत. त्याने ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४२१ धावा केल्या आहेत. त्याने ५१ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११०४ धावा केल्या आहेत. श्रेयसच्या एकूण T20 रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याने २१४ सामन्यांमध्ये ५६२९ धावा केल्या आहेत.

यात त्याने २ शतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत. अय्यरचा सर्वोत्कृष्ट टी-२० धावा १४७ धावा आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. केकेआरपूर्वी अय्यर दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळला आहे.

मुंबई संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, आंग्रिश रघुवंशी, जय बिस्ता, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, साईराज पाटील, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, हिमांशू सिंह, तनेश कुमार सिंह, तनमुष सिंह , मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, जुनैद खान.

Whats_app_banner