SMAT 2024 : मुंबई-बडोदा सामना कधी? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सेमी फायनलचं वेळापत्रक आलं, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SMAT 2024 : मुंबई-बडोदा सामना कधी? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सेमी फायनलचं वेळापत्रक आलं, पाहा

SMAT 2024 : मुंबई-बडोदा सामना कधी? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सेमी फायनलचं वेळापत्रक आलं, पाहा

Dec 12, 2024 09:29 AM IST

SMAT 2024 Semi Final Schedule : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बडोदा, मुंबई, दिल्ली आणि मध्य प्रदेश संघांनी प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीचे सामने १३ डिसेंबरपासून बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.

SMAT मुंबई-बडोदा सामना कधी? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सेमी फायनलचं वेळापत्रक आलं, पाहा
SMAT मुंबई-बडोदा सामना कधी? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सेमी फायनलचं वेळापत्रक आलं, पाहा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी२०२४ स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बुधवारी (११ डिसेंबर) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीनंतर ४ संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 

पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याने बंगालला पराभूत केले होते, तर पुढील तीन सामन्यात दिल्लीने उत्तर प्रदेशला, मध्य प्रदेशने सौराष्ट्रला आणि मुंबईने विदर्भाला पराभूत करून सेमी फायनल गाठली. 

या स्पर्धेची उपांत्य फेरी १३ डिसेंबर रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. पहिला उपांत्य सामना बडोदा आणि मुंबई यांच्यात होईल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दिल्ली आणि मध्य प्रदेश संघ आमनेसामने येतील. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चा अंतिम सामना रविवारी (१५ डिसेंबर) रंगाणार आहे.

तारीखसामनावेळ
१३ डिसेंबर बडोदा वि. मुंबई (सेमी फायनल-१)सकाळी ११ वाजता
१३ डिसेंबरदिल्ली वि. मध्य प्रदेश (सेमी फायनल- २)सायंकाळी ४.३० वाजता

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सेमीफायनलचे लाईव्ह स्ट्रीमिंग

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होत आहे. या दोन्ही सेमीफायनलचा आनंद चाहत्यांना या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन घेता येणार आहे. 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सेमीफायनलचे लाइव्ह टेलिकास्ट 

त्याचबरोबर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने टीव्हीवर स्पोर्ट्स १८ या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकतात. 

उपांत्यपूर्व फेरी सामन्यांचे निकाल 

सय्यद मुश्ताक अली करंडक उपांत्यपूर्व फेरीत रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. बडोद्याने बंगालवर ४१ धावांनी मात केली, तर हार्दिक पांड्याने २७ धावांत ३ बळी घेतले. 

सौराष्ट्रने दिलेले १७० धावांचे लक्ष्य मध्य प्रदेशने ६ गडी राखून पूर्ण केले. यानंतर मुंबईने २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भावर १९.२ षटकांत ६ गडी राखून विजय मिळवला. अनुज रावतच्या ७३ धावा आणि प्रिन्स यादवच्या (३६ धावांत ३ बळी) शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने उत्तर प्रदेशवर १९ धावांनी मात केली.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या