Steve Smith Hundred : स्कूप, रिव्हर्स स्विप, स्विच हिट… स्टीव्ह स्मिथचं हे रूप बघितलं का, BBL मध्ये ठोकलं वादळी शतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Steve Smith Hundred : स्कूप, रिव्हर्स स्विप, स्विच हिट… स्टीव्ह स्मिथचं हे रूप बघितलं का, BBL मध्ये ठोकलं वादळी शतक

Steve Smith Hundred : स्कूप, रिव्हर्स स्विप, स्विच हिट… स्टीव्ह स्मिथचं हे रूप बघितलं का, BBL मध्ये ठोकलं वादळी शतक

Jan 11, 2025 01:30 PM IST

Steve Smith Century In BBL : स्टीव्ह स्मिथने बिग बॅश लीगमध्ये पर्थविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. स्मिथने ६४ चेंडूत १२१ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून १० चौकार आणि ७ षटकार आले.

Steve Smith Hundred : स्टीव्ह स्मिथचा बिग बॅश लीगमध्ये धमाका, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ट्रेलर दाखवला
Steve Smith Hundred : स्टीव्ह स्मिथचा बिग बॅश लीगमध्ये धमाका, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ट्रेलर दाखवला

Sydney Sixers Vs Perth Scorchers Scorecard : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतकं झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथच्या बॅटने टी-20 क्रिकेटमध्येही दम दाखवला आहे. शनिवारी (११ जानेवारी) बिग बॅश लीगमध्ये (Steve Smith BBL) सिडनी सिक्सर्सकडून खेळणाऱ्या स्मिथने पर्थ स्कॉचर्सविरुद्ध अवघ्या ५८ चेंडूत शतक झळकावले.

स्टीव्ह स्मिथ ६४ चेंडूत १२१ धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून १० चौकार आणि ७ षटकार आले. त्याने मैदानात सर्वत्र फटकेबाजी केली. स्मिथने रिव्हर्स लॅप, स्विच हिट आणि स्कूपसह अनेक नाविन्यपूर्ण शॉट्स खेळले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्मिथला आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. २०२१ पासून तो आयपीएल खेळलेला नाही. यानंतर तो लिलावात अनसोल्ड राहिला. स्मिथने आयपीएलचे १०३ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या बॅटमधून एका शतकासह २४८५ धावा झाल्या आहेत. आयपीएलमध्ये स्मिथचा स्ट्राइक रेट १२८.०९ आहे.

सिडनीने २२२ धावा केल्या

स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकाच्या बळावर सिडनी सिक्सर्सने प्रथम खेळून २० षटकांत ३ गडी गमावून २२२ धावा केल्या. स्मिथने शेवटच्या षटकात तीन षटकार ठोकले. या सामन्यात स्मिथने डावाची सुरुवात केली. सिडनीतर्फे जोश फिलिपने ९, कुर्टिस पॅटरसनने १२, कर्णधार मोईसेस हेन्रिक्सने ४६ आणि बेन ड्युवार्सिसने नाबाद २५ धावा केल्या.

भारताविरुद्ध दोन शतके झळकावली

स्टीव्ह स्मिथने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध दोन शतके झळकावली होती. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू होता. त्याने पाच सामन्यात ३४.८९ च्या सरासरीने दोन शतकांसह ३१४ धावा केल्या. या मालिकेत स्मिथची सर्वोच्च धावसंख्या १४० धावा होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या