IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका, सूर्यकुमार यादव सुरुवातीचे सामने खेळणार नाही; कारण काय?-suryakumar yadav will not play few matches for mumbai indians in ipl 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका, सूर्यकुमार यादव सुरुवातीचे सामने खेळणार नाही; कारण काय?

IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका, सूर्यकुमार यादव सुरुवातीचे सामने खेळणार नाही; कारण काय?

Jan 08, 2024 04:51 PM IST

Suryakumar Yadav: मुंबईचा स्टार फंलदाज सूर्यकुमार यादव सुरुवातीच्या आयपीएल २०२४ मधील सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वाढली आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

Mumbai Indians: आयपीएलच्या १७व्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ मधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याची शक्यता आहे. सूर्यकुमारवर हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे सूर्यकुमार जवळपास तीन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल सुरू होणार असल्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमारचे खेळणे जवळपास कठीण आहे.

हर्नियाशिवाय सूर्यकुमार यादवलाही घोट्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. विश्वचषकानंतर सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी- २० सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी- २० मालिकेतही उत्कृष्ट फॉर्म दाखवला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या सूर्यकुमारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृ्त्तानुसार, शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादवला मैदानात परतण्यासाठी किमान नऊ आठवडे लागतील. सूत्राच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला की, सूर्यकुमारची दुखापत गंभीर असून त्याला सावरण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतण्यासाठी जवळपास नऊ आठवड्यांचा कालावधी लागतो. आयपीएलपर्यंत तो बरा होईल, अशी अपेक्षा आहे.

सूर्यकुमार यादवसाठी २०२३ हे वर्ष अत्यंत वाईट ठरले. सूर्यकुमारला एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. पण सूर्यकुमार यादवला काही खास कामगिरी करता आली नाही. संजू सॅमसनऐवजी सूर्यकुमार यादवचा विश्वचषक संघात समावेश करण्याच्या निर्णयावर सातत्याने टीका होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सूर्यकुमारला एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पुन्हा संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

सूर्यकुमार हा टी-२० मध्ये संघाचा महत्त्वाचा भाग आहे. सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी केली. सूर्यकुमार यादव यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणार हे निश्चित मानले जात आहे.

विभाग