Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळेल का? 'या' खेळाडूंकडून मिळतेय तगडी स्पर्धा-suryakumar yadav wants to earn indian test spot again ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळेल का? 'या' खेळाडूंकडून मिळतेय तगडी स्पर्धा

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळेल का? 'या' खेळाडूंकडून मिळतेय तगडी स्पर्धा

Aug 27, 2024 05:23 PM IST

टी-२० फॉरमॅटमध्ये आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या सूर्यकुमारला इतर दोन फॉरमॅटमध्ये संघात स्थान मिळवता आलेले नाही. इतर फलंदाजांच्या तुलनेत त्याला सातत्याने संधी मिळाली, पण त्याचा फायदा करण्यात त्याला यश आले नाही.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळेल का? 'या' खेळाडूंकडून मिळतेय तगडी स्पर्धा
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळेल का? 'या' खेळाडूंकडून मिळतेय तगडी स्पर्धा (PTI)

टी-20 फॉरमॅटचा सर्वात धोकादायक फलंदाज आणि टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. बुची बाबू स्पर्धेनंतर सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीही खेळणार आहे.

दरम्यान, त्याने भारतासाठी रेड बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, ते इतकं सोपं नसल्याची कबुलीही तो स्वत:च देतो.

टी-२० फॉरमॅटमध्ये आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या सूर्यकुमारला इतर दोन फॉरमॅटमध्ये संघात स्थान मिळवता आलेले नाही. इतर फलंदाजांच्या तुलनेत त्याला सातत्याने संधी मिळाली, पण त्याचा फायदा करण्यात त्याला यश आले नाही.

सूर्याला या खेळाडूंकडून तगडी स्पर्धा

मुंबईचा सरफराज खान आणि श्रेयस अय्यर यांच्यासोबत केएल राहुल आणि रजत पाटीदार हे कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या बाबतीत सूर्यकुमारच्या पुढे आहेत. पण सूर्यकुमारला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

बुची बाबू टूर्नामेंट खेळण्यासाठी कोईम्बतूरला पोहोचलेला सूर्यकुमार मुंबईतील प्रशिक्षण सत्रानंतर म्हणाला, 'अनेकांनी आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मलाही हे स्थान पुन्हा मिळवायचे आहे. मी भारताकडून कसोटीत पदार्पण केले, त्यानंतर मला दुखापतही झाली. अनेकांना संधी मिळाली आणि त्यांनी चांगली कामगिरी केली.

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, सूर्यकुमार म्हणाला, 'जर माझी जागा उपलब्ध झाली तर मलाही संधी मिळेल, पण ते माझ्या हातात नाही. मी फक्त बुची बाबू आणि दुलीप ट्रॉफीमध्ये कामगिरी करणे आणि माझी संधी येण्याची वाट पाहणे एवढेच करू शकतो.

सध्या, सूर्यकुमार बुची बाबू स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोईम्बतूरला पोहोचला आहे, त्यानंतर तो दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेण्यासाठी अनंतपूरला जाणार आहे. सूर्यकुमार हा दुलीप ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील भारत 'सी' संघाचा भाग आहे.

'रेड बॉल क्रिकेट नेहमीच माझे प्राधान्य'

सूर्यकुमार म्हणाला, 'रेड बॉल क्रिकेटला नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. मी मोठा होत असताना, मुंबईच्या मैदानात खेळत असतानाच माझे दीर्घ फॉरमॅट क्रिकेटचे प्रेम वाढत गेले. मी गेल्या १० वर्षात बरेच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.

बुची बाबू असो किंवा दुलीप ट्रॉफी असो, मला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळावी असे मला नेहमीच वाटते. या स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून भविष्यात त्यांना देशासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे.