कसोटी करिअर वाचवण्यासाठी उद्यापासून मैदानात उतरणार हे स्टार खेळाडू, तिघेही रोहित शर्माचे खास, पाहा-suryakumar yadav shreyas iyer sarfaraz khan play in buchi babu tournament 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  कसोटी करिअर वाचवण्यासाठी उद्यापासून मैदानात उतरणार हे स्टार खेळाडू, तिघेही रोहित शर्माचे खास, पाहा

कसोटी करिअर वाचवण्यासाठी उद्यापासून मैदानात उतरणार हे स्टार खेळाडू, तिघेही रोहित शर्माचे खास, पाहा

Aug 26, 2024 06:23 PM IST

सूर्यकुमार यादवने टी-20 फॉरमॅटमध्ये खूप प्रभावित केले आहे. पण कसोटी फॉरमॅटमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. सूर्यकुमार यादवने बुची बाबू स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास तो भारतीय कसोटी संघात पुनरागमन करू शकतो.

Buchi Babu Tournament 2024 : कसोटी करिअर वाचवण्यासाठी उद्यापासून मैदानात उतरणार हे स्टार खेळाडू, तिघेही रोहित शर्माचे खास, पाहा
Buchi Babu Tournament 2024 : कसोटी करिअर वाचवण्यासाठी उद्यापासून मैदानात उतरणार हे स्टार खेळाडू, तिघेही रोहित शर्माचे खास, पाहा

भारतातील देशांतर्गत बुची बाबू क्रिकेट स्पर्धा मंगळवारपासून (२७ ऑगस्ट) सुरू होत आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरसारखे दिग्गज खेळताना दिसणार आहेत. दोन्ही खेळाडू मुंबई संघाचा भाग असतील. वास्तविक, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर भारतीय कसोटी संघातील आपला दावा मजबूत करण्यासाठी स्पर्धेत उतरतील.

या दोन्ही खेळाडूंना बुची बाबू स्पर्धेत चांगली कामगिरी करून भारतीय कसोटी संघाचे दरवाजे ठोठावायचे आहेत. मंगळवारी मुंबई आणि टीएनसीए (TNCA) इलेव्हन संघ आमनेसामने असतील. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर मुंबईच्या जर्सीत दिसणार आहेत.

दोन्ही खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्वाची?

वास्तविक, सूर्यकुमार यादवने टी-20 फॉरमॅटमध्ये खूप प्रभावित केले आहे. पण कसोटी फॉरमॅटमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. सूर्यकुमार यादवने बुची बाबू स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास तो भारतीय कसोटी संघात पुनरागमन करू शकतो. त्याचवेळी श्रेयस अय्यर खराब फॉर्मशी झुंजत आहे. याशिवाय श्रेयस अय्यरची कसोटी कारकीर्द निराशाजनक राहिली आहे.

तथापि, श्रेयस अय्यरला दुलीपने ट्रॉफीपूर्वी त्याच्या खराब फॉर्ममधून सावरावे असे वाटेल. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले असले तरी हा फलंदाज सतत खराब फॉर्ममधून जात आहे.

नुकतेच सूर्यकुमार यादवला भारतीय T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेचा ३-० असा पराभव केला. वास्तविक, आकडेवारीवरून असे दिसून येते की सूर्यकुमार यादवची T20 कारकीर्द चमकदार आहे, परंतु कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमध्ये त्याचे स्थान निश्चित करण्यात तो अपयशी ठरला आहे. 

मात्र, सूर्यकुमार यादवची नजर बुची बाबू स्पर्धेत चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यावर असेल. मात्र, बुची बाबू स्पर्धेत सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बुची बाबू स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व सरफराज खान करणार आहे.

दुलीप ट्रॉफी ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सूर्यकुमारने गेल्या वर्षी दुलीप ट्रॉफीमध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यावेळी त्याला ४ डावात केवळ ७१ धावा करता आल्या होत्या. सरफराजने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने पाच डावात २०० धावा केल्या ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.