मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  सूर्यकुमार यादवनं रचला इतिहास, दोनदा पटकावला 'टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार

सूर्यकुमार यादवनं रचला इतिहास, दोनदा पटकावला 'टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2024 05:37 PM IST

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने सलग दुसऱ्यांदा टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

ICC T20I Player of the Year 2023: आयसीसीने नुकतीच 'टी- २० क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराची घोषणा केली आहे. अल्पेश रमाजानी, मार्क चॅपमन आणि सिंकदर रझा यांना मागे सोडत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने हा पुरस्कार जिंकला. दोन वेळा आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑफ द ईअर पुरस्कार जिंकणारा सूर्यकुमार यादव एकमेव खेळाडू आहे. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला हा पुरस्कार दोन वेळा जिंकता आला नाही.

सूर्यकुमार यादव हा आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. त्याने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याने १८ टी-२० सामन्यामध्ये ४८.८६ च्या सरासरीने आणि १५५.९५ च्या स्ट्राइक रेटने ७३३ धावा केल्या. ज्यात दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याने गेल्या वर्षी जानेवारीत राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने नऊ षटकार आणि सात चौकार मारले होते. या शतकासह तो रोहित शर्मानंतर टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरा सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला.

सूर्याकुमारची उत्कृष्ट कामगिरी

सूर्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पराभव केला. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. मात्र, कर्णधारपदाचे ओझे असतानाही सूर्यकुमारच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता. जोहान्सबर्ग येथे वर्षातील शेवटच्या टी-२० सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४२ चेंडूत ८० धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३६ चेंडूत ५६ धावा आणि ८२ चेंडूत १०० धावांची खेळी केली.

सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्द

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ६० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यात त्याने ४५.५ च्या सरासरीने २ हजार १४१ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नावावर ४ शतक आणि १७ अर्धशतकांची नोंद आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi