मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Surya Kumar Injury: हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी; सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट

Surya Kumar Injury: हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी; सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 13, 2024 11:58 AM IST

Suryakumar Yadav Fitness Updates: गेल्या वर्षी डिसेंबरपासून क्रिकेटपासून दूर असलेला सूर्यकुमार यादव सध्या बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट ॲकेडमीत आहे.

Suryakumar Yadav of Mumbai Indians
Suryakumar Yadav of Mumbai Indians (PTI)

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSK vs RCB) एकमेकांशी भिडणार आहेत. त्यानंतर इतर संघाचे सामने होतील. मात्र, यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अजूनही दुखापतीतून सावरला नसून तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील आयपीएल २०२४ स्पर्धेतील सलामीचा सामना खेळला जाईल. त्यानंतर २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्स बलाढ्य गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. मात्र, यापूर्वी सूर्यकुमारच्या दुखापतीने मुंबईच्या संघाचे टेन्शन वाढवले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीएची वैद्यकीय टीम सूर्याला यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही.

सूर्यकुमारला गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला डिसेंबर २०२३ पासून मैदान सोडावे लागले. त्याच्या दुखपतीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. सूर्यकुमार आयपीएल २०२४ खेळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आता त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. सूर्यकुमार सध्या बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट ॲकेडमीत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना खेळण्यास अजून १२ दिवस शिल्लक आहेत. मात्र, तोपर्यंत दुखापतीतून सावरणे हे सूर्यकुमारसमोर मोठे आव्हान असेल. सूर्यकुमार शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिसला होता.

सूर्यकुमार हा भारताच्या टी-२० संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने ६० टी-२० सामन्यात १७१ पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि २ हजार १४१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार टी-२० शतके आहेत. एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिका जिंकून दिली.

IPL_Entry_Point