India Sri Lanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; टी-20 संघाच्या कर्णधारपदी सूर्याची वर्णी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  India Sri Lanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; टी-20 संघाच्या कर्णधारपदी सूर्याची वर्णी

India Sri Lanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; टी-20 संघाच्या कर्णधारपदी सूर्याची वर्णी

Updated Jul 18, 2024 08:05 PM IST

Team India Squad for Sri Lanka Tour: श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

सुर्यकुमार यादव टीम इंडियाचा नवा टी-२० कर्णधार
सुर्यकुमार यादव टीम इंडियाचा नवा टी-२० कर्णधार (Surjeet Yadav)

Team India Squad Announced for Sri Lanka Tour: झिम्बाब्वेला त्यांच्याच देशात धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम  ३ एकदिवसीय सामने व तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या दौऱ्यासाठी भारतीय शिलेदार निवडले आहेत. रोहित शर्माने टी२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवले गेले आहे. बुमराहला श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

रोहित शर्माच्या जागी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा टी-२० संघाचा नवा कर्णधार बनला आहे. भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी वनडेत पुनरागमन करेल, तर विराट कोहलीही ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहे. 

सूर्यकुमारने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत  संघाचे नेतृत्व केले होते.  त्यावेळी रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकानंतर निवडीसाठी उपलब्ध नव्हता. टी-२० विश्वचषकादरम्यान भारताचा उपकर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्यालाही टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. फिटनेसशी संबंधित कारणामुळे हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत नसल्याची नसल्याची चर्चा होती.

शुभमन गिलला टी-२० आणि वनडे अशा दोन्ही प्रकारच्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. गिलच्या नेतृत्वाखाली नवोदित खेळाडूंच्या भारतीय संघाने झिम्बाब्वेवर पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी मात केली.  गिलचा झिम्बाब्वे मालिकेतील उपकर्णधार पॉवर हिटर संजू सॅमसनलाही श्रीलंका दौऱ्यासाठी  संघात स्थान देण्यात आले आहे.

सलामीवीर यशस्वी जयस्वाल, अष्टपैलू शिवम दुबे, रिंकू सिंग, रियान पराग यांनी श्रीलंका मालिकेसाठी आपले स्थान कायम राखले आहे. रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर हे युवा खेळाडू फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

टी-२० मालिकेसाठी संघ-

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मो. सिराज.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल , ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

भारत-श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक -

२७ जुलै- पहिला टी२०, पल्लेकेल

२८ जुलै- दूसरा टी२०, पल्लेकेल

३० जुलै- तिसरा टी२०, पल्लेकेल

२ ऑगस्ट - पहिला एकदिवसीय सामना, कोलंबो

४ ऑगस्ट- दूसरा एकदिवसीय सामना, कोलंबो

७ ऑगस्ट- तिसरा एकदिवसीय सामना, कोलंबो

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या