मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Suresh Raina : 'चिन्ना थाला' पिवळ्या जर्सीत परतणार, सुरेश रैना या टी-20 संघाच्या कर्णधारपदी

Suresh Raina : 'चिन्ना थाला' पिवळ्या जर्सीत परतणार, सुरेश रैना या टी-20 संघाच्या कर्णधारपदी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 12, 2024 05:10 PM IST

Suresh Raina IVPL 2024 : सुरेश रैना इंडियन वेटरन प्रीमियर लीगमध्ये (IVPL) खेळताना दिसणार आहे. ही लीग २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून रैना व्हीव्हीआयपी उत्तर प्रदेश संघाकडून खेळणार आहे. ही माहिती समोर येताच रैनाचे चाहते खूश झाले आहेत.

Suresh Raina IVPL 2024
Suresh Raina IVPL 2024

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. सुरेश रैना हा T20 मध्ये एक विशेषज्ञ फलंदाज मानला जातो आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रैना जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळताना दिसतो. 

सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा भाग होता आणि त्याने संघाला ४ वेळा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण २०२२ मध्ये त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. 

पण आता अशी माहिती येत आहे, की रैना पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

रैना इंडियन वेटरन प्रीमियर लीगमध्ये खेळणार

T20 स्पेशालिस्ट फलंदाज सुरेश रैना हा 'मिस्टर आयपीएल' म्हणूनही ओळखला जातो. तो CSK कडून दीर्घकाळ खेळला आहे. सुरेश रैनाने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर जगभरातील लीगमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आहे आणि नुकतीच एक बातमी समोर आली आहे की तो आणखी एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

सुरेश रैना इंडियन वेटरन प्रीमियर लीगमध्ये (IVPL) खेळताना दिसणार आहे. ही लीग २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून रैना व्हीव्हीआयपी उत्तर प्रदेश संघाकडून खेळणार आहे. ही माहिती समोर येताच रैनाचे चाहते खूश झाले आहेत. 

रैनाचे आयपीएल करिअर

सुरेश रैनाच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या कारकिर्दीत चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये खेळताना सुरेश रैनाने २०५ सामन्यांमध्ये ३२.५१ च्या सरासरीने आणि १३६.७६ च्या स्ट्राईक रेटने ५५२८ धावा केल्या आहेत आणि यादरम्यान त्याने १ शतक आणि ३९ अर्धशतकं केली आहेत.

रैनासोबतच हे खेळाडू खेळणार IVPL

सुरेश रैनासोबतच रजत भाटिया आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॉन क्रिस्टियन हे देखील यूपी संघात दिसणार आहेत. या खेळाडूंच्या जोरावर यूपीचा संघ आयव्हीपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

बोर्ड फॉर वेटरन क्रिकेट इन इंडिया द्वारे आयोजित या स्पर्धेत वीरेंद्र सेहवाग, मुनाफ पटेल, सुरेश रैना, रजत भाटिया, ख्रिस गेल, प्रवीण कुमार आणि युसूफ पठाण यांसारखे खेळाडू दिसणार आहेत.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi