भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आज ( २७ नोव्हेंबर) ३८ वर्षांचा झाला आहे. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाने टीम इंडियासाठी अनेक मोठे यश संपादन केले आहे. त्याच्या निवृत्तीनंतर आजपर्यंत टीम इंडियाला त्याच्यासारखा मधल्या फळीचा फलंदाज आणि पार्ट टाईम गोलंदाज सापडलेला नाही.
मुरादनगरच्या गल्लीबोळात क्रिकेट खेळण्यापासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतच्या त्याच्या प्रवासाने सर्वांनाच प्रभावित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटमध्ये शतके झळकावण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.
रैनाला क्रिकेटमधून निवृत्त होऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण आजही त्याची कमाई करोडोंमध्ये आहे. अशा परिस्थितीत सुरेश रैना क्रिकेट व्यतिरिक्त कशामधून पैसा कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती किती आहे, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
भारतीय दिग्गज सुरेश रैना हा मधल्या फळीतील फलंदाज होता.
२०११ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये त्याने अनेकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे, मात्र गौतम गंभीरच्या दुखापतीमुळे त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
२०१०-११ या वर्षात त्याचा ग्रेड-ए लेव्हल - BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला.
२००८ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. CSK ने त्याला ३.२० कोटीमध्ये विकत घेतले होते.
२०११-१३ च्या आयपीएल हंगामात सुरेश रेनीचा पगार ७ कोटींपर्यंत वाढला.
त्यानंतर २०१४ च्या आयपीएल हंगामात त्याला ९.५ कोटी रुपये मिळाले.
२०१६-१७ मध्ये तो गुजरात लायन्सकडून खेळला, जिथे त्याला संघाची कमान देण्यात आली.
स्पोर्ट्सकीडाच्या मते, त्याच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीमुळे त्याची एकूण संपत्ती २५ मिलियन डॉलर्स आहे.
सेलिब्रिटी असल्याने रैनाला अनेक जाहिरातींसाठी करोडो रुपये मिळतात.
सुरेश रैनाचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ११ कोटी रुपये इतके आहे.
सुरेश रैना भारताचा सातवा सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटू आहे.
सुरेश रैनाचे दिल्ली-एनसीआर भागातील गाझियाबाद येथे घर असून, त्याची किंमत १८ कोटी रुपये आहे. राजनगरमधील त्यांचे घर नवीन डिझाइनमध्ये बांधले आहे. त्याचे घर दिसायला एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. त्याच्या घरात एक मोठी बाल्कनी, जीम, गार्डन आणि विशेष थिएटर रूम देखील आहे.
त्याच्या घराच्या बाल्कनीतून दिसणारे दृश्य पाहण्यासारखे आहे. रैनाची पत्नी प्रियांका चौधरी हिने बाल्कनीत अनेक रोपे लावली आहेत. रैनाच्या घरात स्वतंत्र पूजा कक्ष आहे. घराबाहेर एक लॉन देखील आहे.
सुरेश रैनाला आलीशान गाड्यांची आवड असून त्याने अनेक गाड्या आपल्या कलेक्शनमध्ये समाविष्ट केल्या आहेत. या कारमध्ये दोन आसनी पोर्श बॉक्सस्टर, महिंद्रा थार, ऑडी Q7, फोर्ड मस्टँग आणि किरमिजी शेडमधील मिनी कूपर यांचा समावेश आहे. तो रेंज रोव्हर तसेच मर्सिडीज-बेंझ GLE 350D चा अभिमानी मालक आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये BMW देखील आहे.