IPL 2024 : अगली बार 300 पार... पॅट कमिन्सच्या संघाने दिली वॉर्निंग, आता RCB आणि CSK केची खैर नाही!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : अगली बार 300 पार... पॅट कमिन्सच्या संघाने दिली वॉर्निंग, आता RCB आणि CSK केची खैर नाही!

IPL 2024 : अगली बार 300 पार... पॅट कमिन्सच्या संघाने दिली वॉर्निंग, आता RCB आणि CSK केची खैर नाही!

Apr 21, 2024 04:59 PM IST

Sunrisers Hyderabad IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत, विशेषत: सलामीवीर ट्रेविड हेड आणि अभिषेक शर्मा संघाला वेगवान सुरुवात करून देत आहेत.

IPL 2024 : अगली बार 300 पार... पॅट कमिन्सच्या संघाने दिली वॉर्निंग, आता आरसीबी आणि सीएसकेची खैर नाही!
IPL 2024 : अगली बार 300 पार... पॅट कमिन्सच्या संघाने दिली वॉर्निंग, आता आरसीबी आणि सीएसकेची खैर नाही!

IPL 2024 Sunrisers Hyderabad : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादने आतापर्यंत तीनदा २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. हैदराबादच्या फलंदाजांनी विरोधी संघाच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली आहे. डावाच्या सुरुवातीपासूनच हैदराबादचे फलंदाज षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात करतात. आता सनरायझर्स हैदराबादने इशारा दिला आहे की पुढच्या वेळी ते ३०० धावांचा टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न करतील.

आयपीएलच्या या मोसमात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हैदराबादसाठी सलामीची जबाबदारी सांभाळत आहेत. दोन्ही सलामीवीर पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात करतात. हैदराबादने आपला शेवटचा सामना २० एप्रिल (शनिवार) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकात ७ बाद २६६ धावा ठोकल्या.

त्यांच्याकडून ट्रॅव्हिस हेडने २७८.१२च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३२ चेंडूत ८९ धावा केल्या. हेडच्या खेळीत ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. याशिवाय त्याचा सहकारी सलामीवीर अभिषेक शर्माने १२ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या होत्या. 

आता दिल्ली कॅपिटल्सला धुतल्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला की पुढील सामन्यात त्यांचा संघ ३०० धावांचा टप्पा ओलांडू शकतो.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर ‘पुढील सामन्यात हैदराबादची धावसंख्या काय असेल?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना अभिषेक शर्मा म्हणाला, "धावसंख्येच्या सुरुवातीला ३ नंबर चांगला दिसेल." या विधानासह अभिषेक शर्माने स्पष्ट केले की, हैदराबादचा संघ पुढील सामन्यात ३०० धावा करण्याचा प्रयत्न करेल.

पुढील सामने आरसीबी आणि सीएसकेविरुद्ध

आता पुढील सामन्यात हैदराबाद किती मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. हैदराबादचा पुढील सामना गुरुवारी (२५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. तर त्यानंतर २८ एप्रिलला पॅट कमिन्सची सनरायझर्स हैदराबाद धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला भिडेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या