Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, 2nd Match : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात आज (२२ मार्च) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य दिले होते. हैदराबादकडून इशान किशनने नाबाद शतक झळकावले.
यंदाच्या मोसमातही सनरायझर्स हैदराबादचा अंदाज गेल्या वर्षीसारखाच दिसत आहे. हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्याच षटकापासून आपले इरादे स्पष्ट केले होते. या मोसमात शतक झळकावणारा इशान किशन हा पहिला फलंदाज ठरला आहे. तर ट्रॅव्हिस हेडने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या.
इशान किशनने 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो ४७ चेंडूत १०६ धावा करून नाबाद परतला. त्याने सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. इशानच्या बॅटमधून ११ चौकार आणि ६ षटकार आले.
सनरायझर्स हैदराबादच्या सर्व फलंदाजांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. अभिषेक शर्माने ११ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ३ षटकार आले. नितीश कुमार रेड्डीने १५ चेंडूत ३० धावा केल्या.
त्याने ४ चौकार आणि एक षटकार मारला. हेनरिक क्लासेनने १४ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली. क्लासेनने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या डावात एकूण १२ षटकार ठोकले. एसआरएच संघाने एकूण ३४ चौकार मारले.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. जोफ्रा आर्चरच्या नावावर आयपीएलमध्ये लज्जास्पद विक्रम आहे. आर्चरने ४ षटकांत एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या. आता तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल करणारा गोलंदाज बनला आहे. संदीप शर्माने ४ षटकांत ५१ धावा दिल्या तर फिरकी गोलंदाज महिष दिक्षाने ४ षटकांत ५२ धावा दिल्या.
राजस्थानकडून तुषार देशपांडेने ४ षटकात ४४ धावा देत ३ बळी घेतले. तर महिष थीक्षनाने २ बळी घेतले.
संबंधित बातम्या