IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला २३ कोटी रूपये देण्यास तयार, ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला २३ कोटी रूपये देण्यास तयार, ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन

IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला २३ कोटी रूपये देण्यास तयार, ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन

Published Oct 16, 2024 09:55 PM IST

SRH Retained Players List IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादच्या रिटेन खेळाडूंच्या यादीबाबत एक मोठे अपडेट आले आहे. हैदराबाद हेनरिक क्लासेनवर २३ कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे.

IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला २३ कोटी रूपये देण्यास तयार, ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन
IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला २३ कोटी रूपये देण्यास तयार, ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी, सर्व संघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे जमा करायची आहे. आता सनरायझर्स हैदराबादच्या रिटेन खेळाडूंच्या यादीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. आफ्रिकेचा स्टार विकेटकीपर फलंदाज हेनरिक क्लासेन याला संघात कायम ठेवण्यासाठी हैदराबाद १८ कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे.

हेनरिक क्लासेनवर पैशांचा पाऊस

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबाद २३ कोटींमध्ये खरेदी करू शकते. असे झाल्यास तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरेल. सध्या मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू आहे, ज्याच्यावर केकेआरने २०२४च्या मिनी लिलावात २४.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

हेनरिक क्लासेनला आयपीएल २०२४ मध्ये ५.२५ कोटी रुपये पगार मिळाला होता. क्लासेनने गेल्या मोसमात १६ सामन्यात ४७९ धावा केल्या होत्या.

पॅट कमिन्सचा पगार कमी होणार

पॅट कमिन्सला सनराजर्स हैदराबादने २०२४ च्या लिलावात २०.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने आयपीएल २०२४ ची अंतिम फेरी गाठली होती. पण आता त्याला १८ कोटींमध्ये रिटेन केल्याची बातमी आहे. असे झाल्यास त्याच्या पगारात १३.८ टक्के कपात होणार आहे.

अभिषेक शर्माला १४ कोटींच्या स्लॉटमध्ये कायम ठेवल्याची बातमी आहे. IPL २०२४ मध्ये अभिषेकने १६ सामन्यात ४८४ धावा केल्या होत्या. गेल्या मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा तो खेळाडूही होता. त्याने आयपीएल २०२४ मध्ये एकूण ३६ षटकार मारले होते.

IPL २०२४ मध्ये खेळण्यासाठी अभिषेकला ६.५ कोटी रुपये मानधन मिळाले होते. आता जर त्याला १४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं तर त्याच्या पगारात फरकाच्या दुप्पट वाढ होणार आहे.

उर्वरित खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत SRH ने अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाही. पण सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाने ट्रॅव्हिस हेड आणि भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांनाही त्यांच्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या