सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जवर २ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत १८२ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाने २० धावांतच आघाडीच्या तिन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या.
मात्र, सॅम करन आणि सिकंदर रझा यांनी अनुक्रमे २९ आणि २८ धावा करत पंजाबचेला सामन्यात परत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी ठरले.
SRH च्या वतीने विशेषत: भुवनेश्वर कुमार आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी तगडी गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना दडपणाखाली आणले.
पण शेवटी पंजाबच्या शशांक सिंगने ४६ धावांची खेळी खेळली, तर आशुतोष शर्मानेही शेवटच्या षटकांमध्ये धुमाकूळ घातला, मात्र पंजाबचा २ धावांनी पराभव झाला.
पंजाबला शेवटच्या ५ षटकात ७८ धावा करायच्या होत्या. पण त्यांचे सातत्याने विकेट पडत राहिल्या. शेवटी पंजाबला १८ चेंडूत ५० धावांची गरज होती. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा ही जोडी पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देण्याच्या तयारीत होती, पण त्यांना यावेळी ते शक्य झाले नाही. दोघांनी तुफानी फलंदाजी शेवटच्या चेंडूपर्यंत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
शेवटी उभय संघांमधील सामना शेवटच्या षटकात अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला होता. पंजाबला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूत २९ धावांची गरज होती, पण शशांक आणि अभिषेक यांना २७ धावाच करता आल्या. शेवटचे षटक जयदेव उनाडकटने टाकले. शशांक आणि आशुतोषच्या स्फोटक खेळीनंतरही पंजाबला ६ गड्यांच्या मोबदल्यात १८० धावाच करता आल्या.
हैदराबादकडून शेवटचे षटक जयदेव उनाडकटने टाकले. या षटकातील पहिल्या चेंडूवर आशुतोषने षटकार ठोकला. उनाडकटने पुढचे दोन चेंडू वाईड टाकले. आता पंजाबला पाच चेंडूत २१ धावांची गरज होती. दुसऱ्या चेंडूवर आशुतोषने शानदार षटकार ठोकला. पंजाबला ४ चेंडूत १५ धावा करायच्या होत्या. आशुतोषने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा केल्या.
चौथ्या चेंडूवर आशुतोषने दोन धावा चोरल्या. आता पंजाबला दोन चेंडूत ११ धावा करायच्या होत्या. उनाडकटने पुन्हा वाईड बॉल टाकला. आशुतोषने सिंगल घेतला. शशांकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. अशा प्रकारे पंजाबला दोन धावा कमी पडल्या.
SRH च्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर भुवनेश्वर कुमारने २ महत्वाचे बळी घेतले. तर पॅट कमिन्स, टी नटराजन, नितीश रेड्डी आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या