मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs SRH : २६२ धावा करूनही आरसीबीचा पराभव, हैदराबादने २५ धावांनी सामना जिंकला; चिन्नास्वामीवर ५४९ धावांचा पाऊस

RCB vs SRH : २६२ धावा करूनही आरसीबीचा पराभव, हैदराबादने २५ धावांनी सामना जिंकला; चिन्नास्वामीवर ५४९ धावांचा पाऊस

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 15, 2024 11:36 PM IST

srh vs rcb Highlights ipl 2024 : सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २५ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत विक्रम होत राहिले. दिनेश कार्तिक आणि ट्रॅव्हिस हेडच्या झंझावाती खेळीने वातावरण तणावाचे केले होते.

srh vs rcb Highlights ipl 2024
srh vs rcb Highlights ipl 2024 (AFP)

आयपीएल २०२४ च्या ३०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २५ धावांनी पराभव केला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (१५ एप्रिल) आरसीबीचा कर्णधार डुप्लेसिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सनरायझर्स हैदराबादने प्रथम खेळताना २० षटकात २८७ धावा केल्या होत्या, ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तर दुसरीकडे, आरसीबीने या लक्ष्याचा पाठलाग करताना, पॉवरप्ले षटकांमध्ये संघाने ७९ धावा केल्या. त्यामुळे आरसीबी हे लक्ष्य गाठू शकते, असे वाटत होते. विराट कोहलीने २० चेंडूत ४२ धावांची झंझावाती खेळी खेळली, तर कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही बॅटने आग लावली. डू प्लेसिसने २८ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावा केल्या.

या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन खेळत नसल्याने खालच्या फळीतील फलंदाजीचा भार दिनेश कार्तिक आणि युवा फलंदाजांवर पडला. दिनेश कार्तिकनेही ३४ चेंडूत ८३ धावांची झंझावाती खेळी केली, पण तो आरसीबीला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

१५ षटकांनंतर, आरसीबीने ६ गडी गमावून १८७ धावा केल्या होत्या आणि संघाला शेवटच्या ३० चेंडूत १०१ धावांची गरज होती. पुढच्या २ षटकात २९ धावा आल्या, पण तरीही संघाला १८ चेंडूत ७२ धावा हव्या होत्या. 

परिस्थिती अशी होती की बेंगळुरूला विजयासाठी प्रत्येक चेंडूवर चौकार हवा होता. शेवटच्या २ षटकात संघाला विजयासाठी ५८ धावांची गरज होती. पण दिनेश कार्तिक माघार घ्यायला तयार नव्हता. कार्तिकने १९व्या षटकात १४ धावा केल्या, पण त्याच षटकात तो ८३ धावा काढून बाद झाला.

कार्तिक बाद होताच हैदराबादचा विजय जवळपास निश्चित झाला होता. हैदराबादने हा सामना २५ धावांनी जिंकला. SRH कडून कर्णधार पॅट कमिन्सने ३, मयंक मार्कंडेने २ आणि टी नटराजनने १ बळी घेतला.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत हा एकच सामना असा झाला आहे, ज्यात दोन्ही संघांनी मिळून ५४९ धावा केल्या आहेत. 

IPL २०२४ मध्ये SRH vs MI सामन्यात एकूण ६२३ धावा झाल्या होत्या. आता RCB vs MI सामन्याने एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम केला आहे. हैदराबाद आणि बेंगळुरू यांच्यातील या सामन्यात एकूण ५४९ धावा झाल्या. 

सोबतच याच सामन्यात एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही झाला आहे. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी २२ तर आरसीबीच्या फलंदाजांनी १६ षटकार ठोकले. या सामन्यात एकूण ३८ षटकार मारले गेले.

हैदराबादचा डाव

सनरायझर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध शानदार फलंदाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या. हैदराबादने आयपीएलच्या याच मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावा केल्या होत्या, ही आयपीएलची सर्वोच्च धावसंख्या होती, पण या सामन्याच्या काही दिवसांनंतरच आपलाच विक्रम मोडला.

आरसीबीसाठी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ५२ धावांत २ बळी घेतले.

IPL_Entry_Point