मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : रिंकू सिंग नाही तर केकेआरचा हा खेळाडू धोनीची कॉपी, गावस्करांनी स्पष्टच सांगितलं

IPL 2024 : रिंकू सिंग नाही तर केकेआरचा हा खेळाडू धोनीची कॉपी, गावस्करांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 12, 2024 09:30 PM IST

Sunil Gavaskar On Rahmanullah Gurbaz : गावस्कर यांनी केकेआरच्या संघाबाबत बोलताना एका खेळाडूची धोनीसोबत तुलना केली. आता तुम्हााल वाटेल धोनीशी तुलना होणारा खेळाडू नवा फिनीशर रिंकू सिंग असेल. पण तसे नाही. गावस्कर यांनी रिंकू सिंग नाही तर रहमानउल्लाह गुरबाजची तुलना धोनीशी केली आहे.

Sunil Gavaskar On ipl 2024, Rahmanullah Gurbaz
Sunil Gavaskar On ipl 2024, Rahmanullah Gurbaz

आयपीएलचे आगामी सीझन (IPL 2024) सुरू होण्यासाठी फक्त काही महिने उरले आहेत. पण या दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडूची एम एस धोनीसोबत तुलना केली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स दोन वेळचा आयपीएल चॅम्पियन आहे. पण केकेआर आगामी मोसमात काही मोठ्या खेळाडूंसोबत मैदानात उतणार आहे. तसेच, श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे संघ आणखी मजबूत होईल.

दरम्यान, गावस्कर यांनी केकेआरच्या संघाबाबत बोलताना एका खेळाडूची धोनीसोबत तुलना केली. आता तुम्हााल वाटेल धोनीशी तुलना होणारा खेळाडू नवा फिनीशर रिंकू सिंग असेल. पण तसे नाही. गावस्कर यांनी रिंकू सिंग नाही तर रहमानउल्लाह गुरबाजची तुलना धोनीशी केली आहे.

सुनील गावस्कर यांनी अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर रहमानउल्ला गुरबाज याचे खूप कौतुक केले आहे. सोबतच त्याची तुलना एमएस धोनीशी केली आहे. 

गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, 'मी जे काही पाहिले त्यावरून मला गुरबाजची फलंदाजी खूप आवडली. तो खूप आक्रमक आहे आणि त्याची फलंदाजी काही प्रमाणात एमएस धोनीसारखी आहे. यामुळेच मला गुरबाजची फलंदाजी आवडली.

गुरबाजचा पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल

भारतात नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ दरम्यान, गुरबाजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडितो तो भारतातील फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना पैसे वाटत होता. आता गावस्करांनी या गुरबाजच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

गावस्कर म्हणाले की, गुरबाजला त्याच्या माणुसकीच्या जोरावरही KKR च्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळायला हवे.

या IPL मध्ये केकेआरचा मार्ग खडतर 

यानंतर पुढे बोलताना गावस्कर म्हणाले की, IPL २०२४ च्या प्लेऑफपर्यंत जाणे KKR साठी सोपे नाही. कारण केकेआरला बहुतेक सामने ईडन गार्डन्सवर खेळायचे आहेत. ईडन गार्डन्सची पीच संथ आहे आणि सध्याच्या संघातील खेळाडूंना संथ पीचवर खेळण्याचा फारसा अनुभव नाही.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi