तो स्वत:च कर्णधारपद सोडेल! रोहित शर्माच्या भवितव्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला सुनील गावसकर यांनी दिली फोडणी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  तो स्वत:च कर्णधारपद सोडेल! रोहित शर्माच्या भवितव्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला सुनील गावसकर यांनी दिली फोडणी

तो स्वत:च कर्णधारपद सोडेल! रोहित शर्माच्या भवितव्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला सुनील गावसकर यांनी दिली फोडणी

Dec 18, 2024 11:19 AM IST

Sunil Gavaskar on Rohit Sharma Captaincy : फॉर्म हरवून बसलेला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्याविषयी सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

तो स्वत:च कर्णधारपद सोडेल! रोहित शर्माच्या भवितव्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला सुनील गावसकर यांनी दिली फोडणी
तो स्वत:च कर्णधारपद सोडेल! रोहित शर्माच्या भवितव्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला सुनील गावसकर यांनी दिली फोडणी

India vs Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह लागलं आहे. अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 'रोहित शर्माची फलंदाजील फ्लॉप कामगिरी अशीच कायम राहिली तर मालिकेच्या शेवटी तो स्वत:च कर्णधारपद सोडेल, असा दावा गावसकर यांनी केला आहे. गावसकरांच्या या विधानामुळं रोहित विरोधी चर्चेला बळ मिळणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही डावांमध्ये धावा करण्यासाठी धडपडत आहे. याआधी न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या नेतृत्वाखाली संघाला तीन सामन्यांची कसोटी मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली. खुद्द रोहितनं मालिकेतील तीन डावात केवळ १२ धावा केल्या आहेत. त्यामुळं त्याच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

काय म्हणाले गावसकर?

‘रोहितला पुढील काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळेल हे स्पष्ट आहे. मात्र त्याला धावा करता आल्या नाहीत तर तो स्वत:च निर्णय घेईल. तो अतिशय प्रामाणिक क्रिकेटपटू आहे, त्याला संघावर ओझं बनायचं नाही. तो भारतीय क्रिकेटची खूप काळजी घेणारा क्रिकेटपटू आहे. त्यामुळं तो स्वत:च बाजूला होईल,' असं गावसकर यांनी एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.

रोहितची सुमार कामगिरी

भारताचा अनुभवी फलंदाज असलेल्या रोहित शर्माला गेल्या १३ डावांमध्ये ११.८३ च्या सरासरीनं केवळ १५२ धावा करता आल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

सध्याच्या सामन्याची स्थिती काय?

पावसामुळं सकाळच्या सत्रात खेळ खेळता आला नाही आणि आता निकाल लागण्यासाठी पुरेसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी विकेटची चिंता न करता फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियानं १८ षटके खेळली आणि केवळ अ‍ॅलेक्स कॅरी (२० चेंडूत २० धावा), पॅट कमिन्स (१० चेंडूत २२ धावा) आणि ट्रॅव्हिस हेड (१९ चेंडूत १७ धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. पावसामुळं चहापानाची विश्रांती घ्यावी लागल्याने भारतानं दुसऱ्या डावात विनाबाद आठ धावा केल्या होत्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या