Sunil Gavaskar Angry Reaction Rishabh Pant Wicket : मेलबर्न कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत सापडला आहे, पण ऋषभ पंतने आपले वाईट फटके खेळणे सोडले नाही. ही पद्धत त्याला महागात पडली, त्यामुळे तो संघ अडचणीत असताना केवळ २८ धावा करून बाद झाला.
सहसा पंत विचित्र शॉट्स खेळून विरोधी संघाला चकित करतो, पण यावेळी कांगारू संघाने त्याला त्याच्याच जाळ्यात अडकवले. त्याची विकेट अशा वेळी पडली जेव्हा भारताला फॉलोऑन वाचवण्यासाठी ८५ धावा करायच्या होत्या. या चुकीमुळे पंतला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. यासोबतच भारतीय दिग्गज सुनील गावस्कर यांनीही ऋषभ पंतवर टीका केली आहे.
मेलबर्न कसोटीत तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने भारताचा डाव १६४ धावांवरून पुढे सुरू केला. पंत-जडेजा चेंडूला यांच्यात चागंली भागीदारी होत होती. यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
पण क्रीझवर सेट झाल्यावर पंत त्याची विकेट अशी फुकटात देईल, हे कोणाला माहीत होते. स्कॉट बोलँडच्या चेंडूवर रॅम्प शॉट मारण्यात तो अपयशी ठरला होता, पण पुढच्याच चेंडूवर त्याने तीच चूक पुन्हा केली आणि नॅथन लायनने त्याचा झेल घेतला. त्याने २८ धावा केल्या.
मेलबर्न कसोटीत समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले, "मूर्खपणाला एक मर्यादा असते. तिथे दोन क्षेत्ररक्षक उभे आहेत, तरीही तुम्हाला तोच शॉट खेळायचा आहे. तुम्ही आधीच एक शॉट मिस केला होता आणि आता बघा कोणत्या क्षेत्ररक्षकाने तुमचा झेल घेतला आहे. याला फुकट विकेट देणे म्हणतात.
हा तुमचा नैसर्गिक खेळ आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. हा तुमचा नैसर्गिक खेळ नाही तर हा मूर्खपणाचा कळस आहे. तुम्ही तुमच्या संघाला निराश केले आहे आणि तुम्हाला परिस्थिती योग्यरित्या समजून घेणे आवश्यक आहे.”
संबंधित बातम्या