Video : मुंबई-आरसीबी सामना कोण जिंकेल? चक्क रस्त्यावरील श्वानांनी केली भविष्यवाणी, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : मुंबई-आरसीबी सामना कोण जिंकेल? चक्क रस्त्यावरील श्वानांनी केली भविष्यवाणी, पाहा

Video : मुंबई-आरसीबी सामना कोण जिंकेल? चक्क रस्त्यावरील श्वानांनी केली भविष्यवाणी, पाहा

Apr 10, 2024 10:14 PM IST

ipl 2024 mi vs rcb : आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात सामना होणार आहे. हा सामना कोण जिंकेल, याची भविष्यवाणी चक्क रस्त्यावरील श्वानांनी केली आहे.

mi vs rcb dogs predicted match result मुंबई-आरसीबी सामना कोण जिंकेल? चक्क रस्त्यावरील श्वानांनी केली भविष्यवाणी, पाहा
mi vs rcb dogs predicted match result मुंबई-आरसीबी सामना कोण जिंकेल? चक्क रस्त्यावरील श्वानांनी केली भविष्यवाणी, पाहा

mi vs rcb dogs prediction match result : आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी (११ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. इनसाइड स्पोर्टने या सामन्याचा अंदाज एका अनोख्या पद्धतीने वर्तवला आहे. इनसाइड स्पोर्ट्सने सामन्याच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यासाठी चक्क श्वानांची मदत घेतली आहे.

वास्तविक, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स सामन्यातील विजेता कोण होईल, याचा अंदाज वर्तवण्यासाठी त्यांनी एका भांड्यावर RCB आणि दुसऱ्या भांड्यावर MI चे स्टिकर लावले. या चॅरिटी इव्हेंटनुसार, ज्या भांड्याकडे सर्वाधिक श्वान वळतील तो संघ उद्याचा सामना जिंकेल.

मुंबई इंडियन्स सामना जिंकेल, श्वानांची भविष्यवाणी

या भविष्यवाणी पद्धतीत श्वानांनी मुंबई इंडियन्सला अधिक पसंती दिली. हा प्रयोग खूपच मनोरंजक आणि रोमहर्षक होता कारण अंदाजानुसार, मुंबई इंडियन्सने आरसीबीवर ५-४ च्या जवळच्या फरकाने विजय मिळवला.

अंदाज वर्तवण्याच्या बाबतीत केलेला हा प्रयोग हास्यास्पद म्हणता येईल, पण या उपक्रमा अंतर्गत स्ट्रीट डॉग यांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी चालना देण्यात आली.

दरम्यान, याआधी पॉल नावाचा ऑक्टोपस फुटबॉल विश्वचषक २०१० मधील सामन्यांचे भाकीत करण्यासाठी खूप प्रसिद्ध झाला होता, परंतु यावेळी भारतातील स्ट्रीग डॉग यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.

MI आणि RCB हेड टू हेड आकडेवारी

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आतापर्यंत ३२ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी मुंबईने १८ सामने जिंकले आहेत आणि १४ वेळा आरसीबीने विजय मिळवला आहे.

उद्याचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, येथे एमआयचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्यामुळे श्वानानी केलेले भाकीत खरे ठरण्याची शक्यता जास्त आहे.

यंदाच्या आयपीएलमध्येे दोन्ही संघांची खराब कामगिरी

दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची स्थिती सध्या फारशी चांगली नाही कारण दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. दुसरीकडे, आरसीबीला ५ पैकी फक्त १ विजय मिळाला आहे. मुंबई आणि बेंगळुरू सध्या गुणतालिकेत अनुक्रमे ८व्या आणि ९व्या स्थानावर आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या